Pune Crime | वडकी येथे घरावर दरोडा ! मदतीला येऊ नये म्हणून शेजार्‍यांच्या घराला बाहेरुन घातल्या कड्या

Pune Crime | robbery at Wadaki ! The outside of the neighbor's house was locked so that help would not come.

पुणे : बहुजननामा ऑनलाईन –   Pune Crime | लोणी काळभोर (Loni Kalbhor) परिसरातील वडकी गावातील एका घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला असून कोणी मदतीला येऊ नये, म्हणून शेजारी राहणार्‍यांचे दरवाजे बाहेरुन बंद करुन त्यांना कोंडल्याचे समोर (Pune Crime) आले आहे.

याप्रकरणी सुभाष संभाजी मोडक (वय ५५, रा. वडकी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, वडकी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात Loni Kalbhor Police Station (गु. र. नं. ५३८/२१) फिर्याद दिली आहे. त्यावरुन लोणी काळभोर पोलिसांनी २० ते २५ वयाच्या ५ चोरट्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. सुभाष मोडक हे घरी झोपले असताना मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास पाच जण जबरदस्तीने त्यांच्या घरात शिरले. चोरट्यांना पाहून त्यांची पत्नी ओरडली. चोरट्यांनी कोयता व काठीचा धाक दाखवत त्यांना मारहाण केली.

 

२५ ग्रॅम सोने, रोख रक्कम, मोबाईल फोन, २ एल ईडी लाईटस व तेलाच्या बाटल्या असा ६१ हजार ५०० रुपयांचा माल जबरदस्तीने चोरुन (Pune Crime) नेला. मोडक यांच्या मदतीला कोणी येऊ नये, म्हणून चोरट्यांनी अगोदर शेजारी राहणार्‍यांचे दरवाजे बाहेरुन बंद करुन त्यांना कोंडले होते. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बिडवे तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title : Pune Crime | robbery at Wadaki ! The outside of the neighbor’s house was locked so that help would not come.

 

Shakti Mohan | एकेकाळी IAS बनण्याचं स्वप्न होतं DID विजेत्या ‘शक्ती मोहन’चं; 36 व्या वर्षी देखील या गोष्टी फॉलो करून रहाते ‘टकाटक’ अन् ‘फिट’

Pune Crime | ‘मोमोज’चे पैसे मागितल्याने गुंडांचा कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; हडपसर परिसरातील घटना

Sameer Wankhede | NCB च्या वानखेडेंमागे पोलीस गुप्तहेर? पोलिस महासंचालकांकडे तक्रार

Modi Government | पेट्रोल पंप उघडून दरमहा करा लाखोची कमाई, मोदी सरकारने आणली नियमांमध्ये शिथिलता