पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून त्याने तरुणीवर बलात्कार (Rape In Pune) केला. या शरीर संबंधातून तरुणी गर्भवती (Pregnant) राहिली असताना तिचा गर्भपात (Abortion) करायला लावून लग्नासाठी जबरदस्ती केली तर अश्लील व्हिडिओ (Pornographic Videos) व्हायरल करण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी पिसोळी (Pisoli, Pune) येथील एका २२ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३७९/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दीपककुमार चौधरी जैस्वाल Deepakkumar Chaudhary Jaiswal (रा. पिसोळी) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार नवले पुलाजवळील (Navale Bridge, Pune) ओयो हॉटेल, वाघोली (OYO Hotels In Wagholi) येथे २० नोव्हेबर २०११ ते ४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपककुमार याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन या तरुणीबरोबर शारीरीक संबंध (Physical Relation) प्रस्थापित केले.
त्यातून ही तरुणी गर्भवती राहिल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले.
त्यानंतर फिर्यादीने लग्नासाठी जबरदस्ती केली तर तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
या धमकीमुळे फिर्यादी या घाबरुन गेल्या होत्या.
शेवटी त्यांनी पोलिसांकडे संपर्क साधून तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक घोगरे (PSI Ghogare) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Raped a young woman of pisoli on the pretext of marriage Threatened to make pornographic videos viral if forced to marry by abortion
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- Nilesh Rane | ‘पवारांबद्दल बाळासाहेब किती अचूक बोलायचे, हे ठाकरेंना कळलं असेल’ – निलेश राणे
- PM Narendra Modi in Dehu | PM मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तुकाराम महाराज मंदिर भागविकांसाठी दोन दिवस बंद
- Deepali Sayed On BJP | ‘एका राज्यसभेने मुख्यमंत्री होता येत नाही, अनाजीपंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही’; दिपाली सय्यद यांचा टोला