पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | एसटी स्टँडवर झोपण्यापेक्षा माझ्या गाडीत झोपा असे सांगून दाम्प्त्याला बसमध्ये झोपायला जागा दिली. पती लघुशंकेसाठी गेला असताना बसचालकाने महिलेवर बसमध्येच दोन वेळा बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) काही तासात या बसचालकाला अटक केली. नवनाथ शिवाजी भोंग (वय ३८, रा. मु. पो. वडापुरी, ता. इंदापूर) असे अटक केलेल्या बसचालकाचे नाव आहे. (Pune Crime)
याप्रकरणी वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे राहणार्या २१ वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०९/२२) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती हे पुण्यात आले होते. ते राहण्यासाठी खोली शोधत होते. स्वारगेट एसटी बसस्थानकाजवळून (Swargate ST Bus Stand) शनिवारी रात्री साडेअकरा वाजता जात होते. तेव्हा रस्त्याच्या कडेला थांबलेल्या नवनाथ भोंग याने त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी खोली शोधत असून आता स्टँडवर झोपायला जात असल्याचे सांगितले. त्याने माझ्या गाडीत झोपा असे सांगून त्यांना गाडीत झोपायला जागा दिली.
पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या पतीला लघुशंका लागली. तेव्हा त्याने पतीला स्वारगेट बस स्टँडवरील स्वच्छतागृहात नेले. तो आत गेल्यावर भोंग हा तेथून पळून गाडीत आला. त्याने बस स्टॉर्ट करुन लांबवर नेले. एका बाजूला बस उभी करुन त्याने महिलेवर एका पाठोपाठ दोन वेळा बलात्कार केला.
त्यानंतर त्याने या महिलेला बसमधून ढकलून देऊन तो बस घेऊन निघून गेला. दरम्यान, फिर्यादीचा पती तेथे आल्यावर बस दिसली नाही, म्हणून त्याने शोधाशोध सुरु केली. तेव्हा काही वेळाने त्याला आपली पत्नी दिसून आली. तिने भोंग याने केलेल्या कुकर्माची माहिती पतीला दिली. ते पहाटे ५ वाजता स्वारगेट पोलीस ठाण्यात आले. त्यांनी सर्व हकीकत सांगितली.
काँबिंग ऑपरेशन संपवून सर्व जण नुकतेच घरी गेले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर (Senior Police Inspector Ashok Indalkar) यांनी तातडीने दोन पथके तयार करुन शोध सुरु केला. तेव्हा सीसीटीव्हीमध्ये बसचा ६६ इतकाच नंबर दिसला. पोलीस पथकांनी सर्वत्र बसचा शोध सुरु केला.
तेव्हा सातारा रोडवरुन (Pune Satara Road) ही संशयित बस एका पथकाला दिसली.
त्यांनी हात दाखवून बस थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने बस थांबविली नाही. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. बिबवेवाडी (Bibvewadi) येथे बस थांबली. बसचालक बस सोडून पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले. तो प्रवासी घेऊन कर्नाटकला (Karnataka) जात होता. स्वारगेट पोलिसांनी तातडीने केलेल्या हालचालीमुळे नराधम हाती लागू शकला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशांक इंदलकर अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Rape On 21 Years Old Woman In Bus By Driver Near Swargate ST Bus Stand Pune Swargate Police Arrest Driver In Few Hours
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :