Pune Crime | लग्नाच्या आमिषाने 17 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार, तरूणावर उत्तमनगर पोलिसांमध्ये FIR
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील उत्तमनगर (Uttamnagar) परिसरात ही घटना (Pune Crime) घडली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत रायकर Prashant Raikar (वय 25) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी 2020 ते 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीसोबत ओळख झाल्यानंतर आरोपी प्रशांतने तिच्याशी प्रेमाचे नाटक केले. यानंतर पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध (physical relation) प्रस्थापित केले. यातून मुलगी गर्भवती (pregnant) राहिली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानुसार पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास उत्तमनगर पोलीस (Uttamnagar Police) करत आहेत.
Web Title : Pune Crime | rape of 17 year old girl in the lure of marriage
FIR against Prashant Raikar in Uttamnagar police station
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pockets |अॅपद्वारे मोबाइल रिचार्जवर मिळवा 10 % कॅशबॅक, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस
Comments are closed.