Pune Crime | भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन मेव्हणीवर केला बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime | rape case in sinhagad road police station
September 14, 2021

पुणे :  बहुजननामा ऑनलाईन  – Pune Crime | भावाला जीवे मारण्याची धमकी देत तरुणाने आपल्या मेव्हणीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक (Pune Crime) प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) एकाला अटक केली आहे. हा प्रकार ९ जुलै २०१९ पासून आतापर्यंत सुरु होता.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे दोघेही धायरी परिसरात रहायला आहेत. आरोपीचे तक्रारदार तरुणीच्या चुलत बहिणीबरोबर लग्न झाले आहे. आरोपीने जबरदस्तीने फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. त्यांनी विरोध केल्यावर त्यांना झाडुने मारहाण केली. हा प्रकार कोणाला सांगितल्यास भावाला जीवे मारण्याची धमकी राहुल याने फिर्यादीला दिली होती. या धमकीमुळे फिर्यादी हा अत्याचार सहन करत होती. शेवटी या अत्याचाराला कंटाळून तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन राहुलला अटक केली आहे.

Web Titel : Pune Crime | rape case in sinhagad road police station

RBI | PMC आणि गुरु राघवेंद्र सहकारी बॅंकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर ! नोव्हेंबरपर्यंत मिळणार पैसे , RBI देणार 10 हजार कोटी

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! पत्नी आणि सासुच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या, मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करुन संपवलं ‘जीवन’

Palghar Anti Corruption | 70 हजाराचे लाच प्रकरण ! रात्री 11 वाजता ACB चा ‘सापळा’; कारवाईत भाजीपाला विक्रेता आणि पोलीस कर्मचारी ‘जाळ्यात’, जाणून घ्या प्रकरण