पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | कोल्हापूर येथील इव्हेंटला कामाला जायचे असल्याचे सांगून एका महिला बाऊन्सरला (Female Bouncer) लॉजवर नेऊन तेथे पाण्यातून गुंगीचे औषध (Chloroform Medicine) देऊन तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना कात्रज (Katraj) येथील हॉटेल किनारा (Hotel Kinara Katraj ) येथे बुधवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी एका २८ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांकडे (Bharti Vidyapeeth Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बाऊन्सर म्हणून काम करतात. त्यांना एका महिलेच्या संपर्कातून कोल्हापूर (Kolhapur) येथे इव्हेंटचे काम मिळाले होते. त्यांच्याबरोबर आणखी एक महिला येणार होती. पहाटे ३ वाजता गाडी असल्याने त्यांना घेऊन जाणार्या तरुणाने कात्रज येथील हॉटेल किनारा येथे बोलविले होते. त्यानुसार त्या मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास तेथे गेल्या. तेव्हा लॉजवर हा तरुण एकटाच होता. दुसरी महिला येणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादी यांच्याकडून प्रवास खर्च म्हणून ७ हजार रुपये घेतले. तेव्हा त्यांना पिण्यासाठी पाणी दिले. त्याच्याकडील बाटलीमधील पाणी पिल्याने त्यांना गुंगी आली व त्यांना झोप लागली. (Pune Crime) त्या गुंगीत असताना त्यांचे कपडे काढून त्याने त्यांच्यावर बलात्कार केला व त्यानंतर तो पळून गेला. पहाटे ४ वाजता त्यांना जाग आल्यावर झालेल्या प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक घावटे (API Ghawate) अधिक तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime | Rape Case Female Bouncer Hotel Kinara in Katraj Bharti Vidyapeeth Police Station
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- Pune Crime | सासरच्यांनी केलेल्या मारहाणीत विवाहितेच्या वडिलांचा मृत्यू, चौघांना अटक
- HDFC, SBI Interest Rate | SBI, HDFC बँकेच्या ग्राहकांना आनंदाची बातमी, मिळणार मोठा फायदा
- Rain in Maharashtra | राज्यातील गारठा झाला कमी, ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता
- Weight Loss Kadha | वजन कंट्रोल करण्यासाठी परिणामकारक आहे ‘हा’ एक काढा