पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | मैत्री करुन प्रेमसंबंध (Love Affair) करुन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केला सरकारी नोकरीसाठी (Money For Government Job) पैसे घेतले. त्यानंतर हे पैसे परत मागितल्यावर तुझ्या होणार्या नवर्याला सांगून लग्न मोडण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी एका तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५०५/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी युवराज आनंदराव पाटील Yuvraj Anandrao Patil (वय २७, रा. रेंदाळ, हातकणंगले – Hatkanangle, जि. कोल्हापूर – Kolhapur) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. हा प्रकार गोवा (Goa), महाबळेश्वर (mahabaleshwar), हिंजवडी येथे २०१८ ते २०२१ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी मुळची शिरोळ (Shirol) येथील राहणारी असून युवराज पाटील हा हातकणंगले येथील राहणारा आहे.
त्यांची पुण्यात ओळख होऊन मैत्री झाली. त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले.
युवराज याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून गोवा येथे नेऊन तेथे लॉजवर (Lodge In Goa) त्यांच्याबरोबर शारिरीक संबंध निर्माण केले.
तसेच महाबळेश्वर, हिंजवडी येथील फ्लॅटवर वारंवार त्यांच्याशी शारिरीक संबंध (Physical Relation) ठेवले. या कालावधीत फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन कंपनीमध्ये प्राब्लेम निर्माण झाला आहे. सरकारी नोकरीसाठी पैसे पाहिजे, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी ११ लाख ६५ हजार रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांनी पैशांची मागणी केल्यावर त्यांना त्यातील फक्त १ लाख ५९ हजार रुपये परत केले. उरलेल्या पैशांची मागणी केल्यावर तुझ्या भावी नवर्याला आपल्याबाबत सांगेन व जमलेले लग्न मोडेल, अशी धमकी दिली. या घटनेनंतर फिर्यादी गावाला निघून गेल्या असून त्यांनी तेथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तेथून हिंजवडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Rape by showing the lure of marriage Taking money of Rs 10 lakh for the job cheating fraud case
हे देखील वाचा :
ED Notice To Avinash Bhosale | प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या अडचणीत भर; आता ED कडून नोटीस