आरोपी राज पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या इतर साथिदारांच्या मदतीने लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन परिसरात दहशत निर्माण करुन गुन्हे केले आहेत. तसेच आरोपीने लोणी काळभोर आणि हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत वारंवार गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे नागरिक त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे (Loni Kalbhor Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांनी आरोपी राज पवार याचा तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे पाठवला होता. प्रस्तावाची पडताळणी करुन मंगळवारी आरोपी राज पवार याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपर करण्याचे आदेश देण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve),अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai)यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale),पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे (PSI Amit Gore), पोलीस अंमलदार गणेश सातपुते, संदिप धनवटे, मल्हारी ढमढेरे यांनी केली आहे.
Web Title :- Pune Crime | Raj Ravindra Pawar, a notorious criminal from Loni Kalbhor area of Pune, was deported for two years