पुणे / यवत : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) पाटस परिसरात रविवारी (दि.26) मध्यरात्रीच्या सुमारास 50 लाखांचा गांजा जप्त (Cannabis Seized) केला असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे (Yavat Police Station) पोलीस निरीक्षक नारायण पवार (Police Inspector Narayan Pawar) यांनी दिली आहे. याप्रकरणी महाराष्ट्रासह (Maharashtra) आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) येथील 7 पुरुष आणि 5 महिलांना अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई (Pune Crime) मध्यरात्री एकच्या सुमारास करुन एक मालवाहतूक ट्रक ताब्यात घेतला आहे.
आरोपींनी हा गांजा पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) काही दुकानात आणि मुंबईत (Mumbai) विक्रीसाठी आणण्यात आला होता, असा संशय पोलिसांना असून यामध्ये जिल्ह्यातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. पुणे आणि मुंबई येथे विक्रीसाठी ट्रकमधून गांजाच्या पिशव्या नेल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाटस (Patas) परिसरात सापळा रचून मिळालेल्या नंबर वरून ट्रक आडवला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ट्रकची तपासणी केल्यावर ट्रकच्या केबिनमध्ये गांजाच्या पिशव्या आढळून आल्या. त्यामध्ये तीस लाख रुपये किंमतीचा पावणे दोनशे किलो गांजा होता. पोलिसांनी ट्रक आणि गांजा असा एकूण 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Pune Rural Yavat Police crackdown daund two hundred kilos cannabis worth rs 78 lakh seized arrest 12
Pune Crime | क्लिप पाहून 12 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणार्या 5 जणांकडून 15 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार; पुण्यातील घटना
NPS Traders | राष्ट्रीय पेन्शन योजना देते छोट्या व्यापार्यांना वृद्धत्वात पेन्शनचा आधार, जाणून घ्या सरकारी योजनेचा कसा घ्यायचा लाभ
Salman Khan | ‘भाईजान’ सलमान खानला ‘सर्पदंश’ ! 7 तास हॉस्पिटलमध्ये अॅडमीट; पनवेलच्या फार्म हाऊसमधील घटना