पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell, Pune) अवैध धंद्याविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईने अप्पा कुंभार (Appa Kumbhar) याने नवनवीन युक्त्या शोधून आपला अड्डा सुरू ठेवला होता. मंगळवार पेठेतील या अड्ड्यावर 11 जून रोजी पहाटे पावणेतीन वाजता छापा टाकून पोलिसांनी 36 जणांवर कारवाई केली. येथे तळघरात वातानुकुलीत हॉलमध्ये जुगार खेळला जात असल्याचे (Pune Crime) आढळून आले होते. या कारवाईनंतरही अप्पा कुंभार याचे जुगार अड्डे (Gambling Den) बंद झाले नसल्याचे समर्थ पोलिसांनी केलेल्या कारवाईत समोर आले आहे. बारणे रोडवरच हा (Pune Crime) अड्डा सुरु असल्याचे दिसून आले असून पोलिसांनी (Pune Police) 5 जणांना अटक केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शुभम राजेंद्र वाघेरे Shubham Rajendra Waghere (वय 26, रा. कुंभारवाडा, नाना पेठ),
सुनिल सुभाष जगताप Sunil Subhash Jagtap (वय 39, रा. नाना पेठ), संदीप मारुती सायकर Sandeep Maruti Saikar (वय 39, रा. गंज पेठ), अमिद गफूर खान Amid Gafoor Khan (वय ४५, रा. लोहगाव),
सचिन सुरेश भुजबळ Sachin Suresh Bhujbal (वय 38, रा. गवळी आळी, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तसेच अप्पा कुंभार (रा. नाना पेठ) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
याबाबत पोलीस शिपाई हेमंत विष्णु पेरणे (Hemant Vishnu Perne) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (Pune Crime) दिली आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाने 11 जून रोजी पहाटे अप्पा कुंभार याच्या बारणे रोडवरील आलिशान जुगार अड्ड्यावर छापा घालून पावणे तीन लाखांचा माल जप्त केला होता. 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या कारवाईनंतरही अप्पा कुंभार याचे जुगाराचे अड्डे सुरुच असल्याचे दिसून आले.
समर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे (API Sandeep Jore) व त्यांचे सहकारी गस्त घालत असताना मंगळवार पेठेतील बारणे रोडवर जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस पथक तेथे गेले असता त्यांना सार्वजनिक रोडवर एका बाजूला जुगार खेळत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी जुगार घेणारे 2 आणि जुगार खेळणारे 3 अशा 5 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1950 रुपये,
जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्याचबरोबर सोमवार पेठेतील शाहू उद्यानाजवळील भाजी मंडईच्या बोळात जुगार खेळणार्या दोघांना पोलिसांनी पकडले.
श्रीकांत संजय ढोबळे Shrikant Sanjay Dhoble (वय ३२, रा. मंगळवार पेठ) आणि आनंद प्रसाद भोसले Anand Prasad Bhosale
(वय ५०, रा. सोमवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून 1 हजार 30 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.