पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन परप्रांतीय तरुणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime) अंमली पदार्थ विरोधी पथक (anti narcotics cell) एक आणि दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक (Anti-robbery and vehicle theft squad) एकने संयुक्त कारवाई करुन बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि.9) कृषी विद्यापीठ चौकातील होमगार्ड ऑफीस समोरील सार्वजनिक रोडवर केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 85 हजार 140 रुपये किमतीचा 4 किलो 257 ग्रॅम गांजा जप्त केला.
ब्रजेंद्रकुमार राजेंद्रकुमार त्रिपाठी (वय-29), शिवमकुमार अवलेश त्रिपाठी (वय-19 दोघे रा. भरभौल, ता. करवी, जि. चित्रकूट, राज्य उत्तर प्रदेश सध्या रा. सनी वल्ड जवळ सुसगाव बाणेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखेचे (Pune Crime Branch Police) अंमली पदार्थ विरोधी पथक एक आणि दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एकचे पोलीस संयुक्तपणे पेट्रोलिंग करत असताना कृषी विद्यापीठ चौकात दोन परप्रांतिय तरुण गांजाची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 85 हजार 140 रुपये किमतीचा 4 किलो 257 ग्रॅम गांजा, दोन मोबाईल असा एकूण 1 लाख 05 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला. आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) एनडीपीएस अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे(Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad), पोलीस हवालदार मनोज साळुंके,विशाल दळवी, संदिप जाधव, पांडुरंग पवार, विशाल शिंदे, पोलीस शिपाई नितेश जाधव, योगेश मोहिते व दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे (Police Inspector Anil Shewale), सहायक पोलीस उप निरीक्षक एस.वाय शेख, पोलीस हवालदार निलेश शिवतरे, पोलीस शिपाई एस.एस.दगडे, एच.एस. कोळप, पोलीस नाईक जी.पीट पाटोळे यांच्या पथकाने संयुक्तपणे केली.
Web Title : Pune Crime | pune police Crime Branch arrests two foreigners for selling cannabis in Pune; One lakh items confiscated
MPSC Exam | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एका वर्षाची मुदत वाढ