पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | पुणे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये वाहन चोरी (Vehicle Theft) करुन त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सराईत वाहन चोराला गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने (Anti-Robbery and Anti-Vehicle Theft Squad) सापळा रचून अटक (Arrest) केली. रोहन उर्फ लोकेश दत्ता धावडे Rohan alias Lokesh Datta Dhavade (वय-27 रा. पर्वती दर्शन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे (Pune Crime) नाव आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने ही कारवाई हडपसर (Hadapsar) येथील गाडीतळ परिसरात (Gadital) केली. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या आहे. पुणे शहरात वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुन्हे शाखेचे दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत गस्त घालत असताना गाडीतळ परिसरात एकजण थांबला असून त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती पथकाला मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने गाडीतळ परिसरात सापळा रचून आरोपी धावडे याला ताब्यात घेतले.
त्याच्याकेड असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीने पुणे शहरातील हडपसर, विश्रांतवाडी (Vishrantwadi) तसेच सातारा जिल्ह्यातील (Satara District) शिरवळ (Shirwal) भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर (Police Inspector Sunil Pandharkar), उपनिरीक्षक गुंगा जगताप (PSI Gunga Jagtap), उदय काळभोर, सुदेश सकपाळ, दत्तात्रय खरपुडे, शिवाजी जाधव यांच्या पथकाने केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests criminal for selling stolen bike
हे देखील वाचा :
Pune Crime | तलवारीला धार लावून न दिल्याने तरुणावर वार, टोळक्यावर FIR