पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Police | 5 लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्यावर 15
लाखांची परतफेड केल्यानंतरही आणखी 8 लाखांची मागणी करुन शिवीगाळ केल्याचा
प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी सावकारी करणार्या
सावकाराला (Moneylender) गुन्हे शाखेच्या युनिट 4 (Pune Police Crime Branch) च्या
पथकाने अटक (Arrest) केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दत्ता गोकुळ वाघमारे Datta Gokul Waghmare (वय 29, रा. विजय विहार अपार्टमेंट, प्रितनगर सोसायटी, चंदननगर) असे या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी येरवड्यातील (Yerwada) एका 38 वर्षाच्या व्यक्तीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी 2018 मध्ये आरोपी दत्ता वाघमारे याच्याकडून 5 लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात त्यांनी आजपर्यंत त्यांना 15 लाखांपेक्षा अधिक पैसे दिले. तरी देखील आणखी 8 लाख रुपयांची वाघमारे फिर्यादीकडे वारंवार मागणी करीत तगादा लावला होता. पैसे दिले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने घुसून मुद्दल व व्याजाचे पैसे (Interest Money) देण्याचे कारणावरुन फिर्यादी व त्यांचे कुटुंबियांना शिवीगाळ केल्याने गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेकडे ही तक्रार मिळताच त्यांनी दत्ता वाघमारे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Money Lender Crime News
हे देखील वाचा :
Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर
Maharashtra Monsoon Update | राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; काही ठिकाणी ऑरेंज Alert
Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण
Uddhav Thackeray Corona Positive | राज्यपालांनंतर आता उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण