पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | फ्लॅट बुक करीत त्यासाठी मोजलेले 8 लाख 68 हजार रुपये देवूनही संबंधित फ्लॅट बिल्डरने (Builder) परस्पर भलत्याच व्यक्तीला विकला. त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी (Uttamnagar Police) एका बिल्डरला अटक केली आहे. (Pune Police Arrest Builder in cheating case) Pune Crime | Pune Police arrest builder mahesh tikhe in cheating case
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महेश रामचंद्र तिखे Mahesh Ramchandra Tikhe (वय 57, रा. बावधन) असे अटक करण्यात आलेल्या बिल्डरचे नाव आहे. त्याने अशाच प्रकारचे सुमारे सहा गुन्हे केल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे. याबाबत नितीन शांताराम यादव (वय 38, रा. आर. एम. डी कॉलेज जवळ, मुंबई -बंगळूर हायवे) यांनी फिर्याद दिली आहे. पाच जानेवारी 2011 ते 28 फेब्रुवारी 2019 या कालावधीत शिवणे परिसरात ही घटना घडली. फिर्यादी यांनी तिखे याच्या शिवणे येथील भगवंतरी या गृहप्रकल्पात दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट बुक केला होता. बुकिंग झाल्यानंतर गुन्हा दाखल होईपर्यंत त्यांनी वेळोवेळी 8 लाख 68 हजार 528 रुपये बिल्डरला दिले. मात्र रक्कम भरून देखील बिल्डरने करार करून दिला नाही.
उलट फिर्यादी यांनी बुक केलेली सदनिका परस्पर दुसऱ्याला विकून फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तिखे याला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. उत्तमनगर पोलिस ठाण्यात (Uttamnagar Police Station) अशा प्रकारच्या सुमारे सहा तक्रारी दाखल आहेत. बुकिंग वेळी दिलेल्या पावतीचे मूळ पुस्तक जप्त करण्यासाठी, गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करण्यासाठी, फिर्यादीने बुक केलेली सदनिका दुसऱ्या कोणाला विकली?, त्या सदनिकेचे कागदपत्रे कोठे तयार करण्यात आली?, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का?, याचा तपास करण्यासाठी तिखे याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील किरण बेंडभर (Public Prosecutor Kiran Bendbhar) यांनी केली. सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने तिखे याला 22 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. उत्तमनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) एस. जी. बोत्रे (Inspector of Police (Crime) S. G. Botre) या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
Web Titel :- Pune Crime | Pune Police arrest builder mahesh tikhe in cheating case
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update