पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Bicycle thief |कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक तरुण बेरोजगार झाले. पैशांची अडचण सोडवण्यासाठी तुरुण गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले. अशाच एका सायकल चोर (Bicycle thief) आशिकला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Pune Crime) आहेत. पुणे पोलिसांनी या चोरट्याकडून महागड्या सायकली जप्त (Pune Crime) केल्या आहेत. आशिक जीवन आले (वय-24 रा. मुंढवा, मूळ रा. दार्जिलिंग, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
हडपसर पोलिसांनी (hadapsar police station) आशिक आले याच्याकडून 1 लाख 55 हजार रुपये किमतीच्या 14 सायकली जप्त केल्या आहे. आरोपी आशिकने पुणे शहराच्या विविध भागातून (Various parts of Pune city) सायकली चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कोरोना कालावधीत कामधंदा नसल्याने पैशांची अडचण सोडवण्यासाठी आशिक आले याने सायकल चोरी केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
फिटनेस वाढविण्यासाठी शहरात अनेकांकडून महागड्या सायकली खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. हीच संधी साधून आणि कामधंदा नसल्याने आरोपीने या सायकल चोरण्याची शक्कल लढवली. त्याने गार्डनजवळ सायकलवर येणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेऊन सायकल चोरण्यास सुरुवात केली. आरोपीने हडपसर परिसरातील ग्लायडिंग सेंटर (Gliding Center), भोसले गार्डन (Bhosle Garden), मगरपट्टा सिटी (magarpatta city), मांजरी, हडपसर परिसरातून सायकली चोरल्या. मांजरी बुद्रुक येथील एका तरुणाची 19 जुलै रोजी सायकल चोरीला गेली होती. त्याने हडपसर पोलिसांकडे तक्ररार दिली होती.
web title: Pune Crime | pune cycle theif arrested by police.
PM Kisan | शेतकर्यांसाठी खुशखबर ! मोदी सरकार शेतकर्यांना देतंय ‘स्वस्त’ कर्ज, जाणून घ्या