पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करून 5 लाख 5 हजार रुपयांची खंडणी (Extortion) घेतल्याचा प्रकार चंदननगर पोलीस स्टेशन (Chandan Nagar Police Station) हद्दीत घडला आहे. त्यापैकी अडीच लाख रुपये ‘फोन पे’द्वारे घेतले होते, तर एक लाख रोख आणि उर्वरित (Pune Crime) रकमेचा मोबाइल घेतला होता. या प्रकरणामध्ये मधुकर विलास सापळे Madhukar Vilas Saple (वय 32, रा. आंबेगाव) याला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर (Bail Granted) झाला असल्याची माहिती अॅड. राकेश सोनार (Adv. Rakesh Sonar) यांनी दिली.
याबाबत विमाननगर येथील 32 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. 14 एप्रिल ते 15 जून 2022 या कालावधीत हा प्रकार घडला होता. फिर्यादीवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, असे खोटे सांगून, तसेच राहत असलेल्या सोसायटीची निवडणूक रद्द करण्यासाठी ही रक्कम स्वीकारण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करून आरोपी मधुकर सापळे याला अटक केली. आरोपी मधुकर सापळे याने जामिनासाठी अॅड. राकेश सोनार यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला होता. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आरोपी सापळे व फिर्यादी यांच्यात व्यावसायिक नातेसंबंध होते व या व्यवसायातून झालेला नफा आरोपीने फिर्यादी यांना मागितला होता.
याला खंडणी म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने अॅड. राकेश सोनार यांनी केला.
वकिलांचा युक्तिवाद गृहीत धरून न्यायालयाने आरोपीला 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
अॅड. राकेश सोनार यांना अॅड. महेश देशमुख (Adv. Mahesh Deshmukh), अॅड. प्रशांत कांबळे (Adv. Prashant Kamble), अॅड. नीतेश वाघमारे (Adv. Nitesh Waghmare),
अॅड. प्रमोद राठोड (Adv. Pramod Rathod) यांनी सहकार्य केले.
Web Title :- Pune Crime | Pune court grants bail to accused who claimed to be policeman and extorted 5 lakhs
हे देखील वाचा :