पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | नांदेडहून (Nanded) सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या कामगाराला अॅन्टी करप्शन (Anti Corruption) अशी बतावणी करुन चौघा जणांनी त्याच्याकडील १७ लाख ५८ हजार ७५० रुपये जबरदस्तीने लुटून नेले. (Pune Crime) ही घटना स्वारगेट येथील वेगा सेंटरजवळील (Vega Center Swargate) ट्रॅव्हल थांब्याजवळ फुटपाथवर ७ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता घडली.
याबाबत मधुरम सत्यनारायण सोनी Madhuram Satyanarayan Soni (वय २७, रा. गंगा सिटी, नांदेड) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांच्याकडील कर्मचारी शंकर भालेराव हे त्यांच्या सांगण्यावरुन सोने खरेदी करण्यासाठी नांदेडहून पुण्याला (Nanded To Pune) प्रवास करुन आले होते. ट्रॅव्हल बसमधून ते स्वारगेटला आले होते. यावेळी एका काळ्या रंगाच्या कारमधून चौघे जण आले.
त्यांच्यातील एकाने शंकर यांच्या खाद्यावर हात टाकून “अॅन्टी करप्शन” अशी बतावणी करुन त्यांना पिस्टलसारख्या हत्याराचा धाक दाखवला (Pune Crime). त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसविले. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील १७ लाख ५८ हजार ७५० रुपयांची बॅग जबरदस्तीने चोरुन ते पळून गेले. ही बाब शंकर यांनी सोनी यांना कळविली. त्यानंतर त्यांनी पुण्यात येऊन फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक रसाळ (API Rasal) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Pretending to be anti corruption robbed a bullion worker of Rs 17 lakh Incident near Vega Center in Swargate
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Benefits Of Strawberry | स्ट्रॉबेरी खाल्ल्याने आरोग्यास होतात ‘हे’ गुणकारी फायदे
Hodgkins Lymphoma | मुलांमधील ‘या’ लक्षणांना किरकोळ समजू नका, ब्लड कॅन्सरचा असू शकतो संकेत