पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | कोंढव्यातील (Kondhwa News) सैनिक नगर परिसरातील क्लाऊड नाईन सोसायटीमधील (cloud nine society pune) बंगल्यात वास्तव्यास राहणार्या जितेन जगदिप सिंग Jiten Jagdeep Singh (42) याच्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (social security cell, Pune Police Crime Branch) मोठी कारवाई केली आहे.
त्याच्या बंगल्यातून विदेशी दारूच्या बाटल्या, पोकर (poker ) जुगाराची साधने, 46 लाख 76 हजार 500 रूपये आणि ऑस्ट्रेलियन 5500 डॉलर तसेच 6700 युएस डॉलर (US Dollar) असा एकुण 58 लाख 30 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) करण्यात आला आहे.
जितेन जगदिप सिंग हा पोकर खेळत असून त्याच्याकडे जुगार खेळण्यास येणार्यांना तो विदेशी दारू पुरवित असल्याची बाबतची गोपीनय माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना मिळाली होती. सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण (Police Inspector Shilpa Chavan) आणि अंमली पदार्थ विरोधी पथक – 1 चे निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad) यांनी प्राप्त माहितीची खातरजमा केली.
जितेन सिंग याच्या बंगल्यातील आणि त्याच्याकडे असलेल्या विदेशी दारूच्या बाटल्या, पोकर जुगाराची साधने, 13 पोकर टेबल, 30 पत्त्याचे कॅटचे बॉक्स आणि रोख 47 लाख 76 हजार 500 रूपये तसेच विदेशी चलन असा एकुण 58 लाख 30 हजार 275 रूपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
जितेन सिंग याच्याविरूध्द कोंढवा पोलिस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime) पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), अप्पर आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे ((DCP Shrinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शिल्पा चव्हाण,
पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक श्रीधर खडके (PSI Shreedhar Khadse), परिविक्षाधिन उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे (PSI Reshma Salunkhe) , विशाल शिंदे (PSI Vishal Shinde), सचिन तरडे (PSI Sachin Tarde), पोलिस अंमलदार मोहिते, पुकाळे, चव्हाण, पठाण, कोळगे तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक – 1 मधील जाधव, पवार, उत्तेकर, साळुंके, पारधी, शेख आणि मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Web Title :- Pune Crime | Police raid that bungalow in Kondhwa, Pune ! 13 poker tables, 30 card boxes, foreign currency, foreign liquor and Rs 46.76 lakh in cash, Rs 58 lakh seized kondhwa police station
Sangli Crime | सांगलीतील धक्कादायक प्रकार ! कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्यानं CA चा महिलेवर बलात्कार
PIB Fact Check | सरकारकडून मिळतंय आधार कार्डवर स्वस्तात कर्ज? जाणून घ्या ‘सत्य’