पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | कोणताही परवाना नसताना बेकायदेशीरपणे फटाका विक्री स्टॉल (Stalls Selling Firecrackers) सुरु केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी मांरुजी गावातील एका स्टॉल धारकावर गुन्हा (FIR) दाखल केला असून त्याचा सर्व फटाका माल जप्त (Pune Crime) केला आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई रवि पवार (Police Constable Ravi Pawar) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९६८/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विलास दत्तात्रय वराडे Vilas Dattatraya Varade (रा. पिंपरी गाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या स्टॉलवरील 8 हजार 850 रुपयांचे फटाके जप्त (Seize Firecrackers) केले आहेत. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस गस्त घालत असताना विलास वराडे यांनी मारुंजी गावात (Marunji Village) रस्त्याच्या कडेला फटाका स्टॉल सुरु केल्याचे आढळून आले.
पोलिसांनी त्यांच्याकडे परवाना विचारला असता कोणताही परवाना आढळून आला नाही.
त्यामुळे पोलिसांनी विनापरवाना ज्वालाग्राही पदार्थांची विक्री करत असल्यावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन सर्व माल जप्त केला आहे.
Web Title :- Pune Crime | Police action against those who started illegal firecracker stalls
हे देखील वाचा :
Pune News | हडपसरमध्ये 15 ऑक्टोबर रोजी कोकण मेळाव्याचे आयोजन