पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | बस येथे का पार्क केली? अशी विचारणा करून तिघांनी PMPML चालकाशी (PMPML Driver) वाद घालून बेदम मारहाण (Beating) केली. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला असून, उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) तिघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार (Pune Crime) गुरुवारी (दि.8) रात्री अकराच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील भगतवाडी, बहुली येथे घडला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत बसचालक सतीश संजय सोनवणे Satish Sanjay Sonwane (वय 34, रा. कळमशेत, पो. कोंढावळे, ता. मुळशी) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.9) तक्रार दिली आहे. या घटनेत सतीश उमप (Satish Ump) हेदेखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी अज्ञात तीन जणांवर आयपीसी 325, 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमपीएमएल चालक असून, ते भगतवाडी येथे बस घेऊन गेले होते. भगतवाडी येथे यात्रा असल्याने त्यांनी बस पुढे जात नसल्याने एका ठिकाणी जागा मालकाची परवानगी घेऊन बस उभी केली होती. त्यानंतर फिर्यादी व सतीश उमप यांनी बसमध्ये जेवण केले. सशी सोनवणे यांनी बस सुरू करून लाइट लावली. त्यावेळी एक अनोळखी तरुण बसमध्ये आला. बस या ठिकाणी पार्क का केली? असे म्हणून फिर्यादी व उमप यांच्यासोबत वाद घातला. तसेच त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.
त्यानंतर त्याने इतर दोन मुलांना बोलावून घेतले.
तिघांनी मिळून लाकडाने व लाथा बुक्क्यांनी फिर्यादी व उमपला मारहाण केली.
यामध्ये फिर्यादी यांच्या कपाळावर टाके पडले असून, उजव्या डोळ्याच्या खालचे हाड फॅक्चर झाले आहे,
तर उमाप यांच्या डाव्या हाताला मार लागला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | PMPML driver brutally beaten in Pune; FIR against three
हे देखील वाचा :
Uddhav Thackeray | उद्या मोदी येऊन आम्हाला टोमणे मारतील – उद्धव ठाकरे
E-Shram Card | 2 लाखांचा फायदा हवा, तर ताबडतोब बनवा ‘हे’ कार्ड; सरकार देत आहे आकर्षक स्कीम