पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पिंपरी- चिंचवड पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Police) मोठी कारवाई (Pune Crime) केली आहे. दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तिघां ओरोपींना पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. त्या तिंघाकडून 2 पिस्तूल, 2 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. अन्य दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने (Anti-Robbery Squad) कृष्णाई पेट्रोल पंपाजवळ वडमुखवाडी येथे सोमवारी (3 जानेवारी) रोजी रात्री पावणे अकराच्या दरम्यान केली आहे.
आकाश अनिल मिसाळ (Akash Anil Misal) (वय 21, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), रुपेश सुरेश पाटील (Rupesh Suresh Patil) (वय 30, रा. मु. पो. वडगाव बुद्रुक, ता. चोपडा, जि. जळगाव), ऋतिक दिलीप तापकीर (Hrithik Dilip Tapkir) (वय 26, रा. पाषाण, पुणे) या तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच करण (Karan) आणि सनी (Sunny) (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यावरही दरोड्याचा गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक सागर ज्ञानदेव शेडगे (Sagar Dnyandev Shedge) यांनी मंगळवारी (4जानेवारी) रोजी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत माहिती अशी, वडमुखवाडी, चऱ्होली येथील कृष्ण पेट्रोल पंपाजवळ आरोपी दरोडा घालण्याच्या उद्देशाने जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनूसार पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या (Pimpri-Chinchwad Police) दरोडा विरोधी पथकाने तिंघाना अटक केली आहे. तर दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Web Title : Pune Crime | pimpri chinchwad police arrested three in robbery case two pistols and two cartridges seized.