Pune Crime | माजी उपसरपंचासह एकाला पिस्टल बाळगल्या प्रकरणी अटक
पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | मावळ तालुक्यातील (Maval taluka) दिवट येथील माजी उपसरपंचासह एकाला पिस्टल (Pistol) बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांच्याकडून 40 हजार रुपयांच्या पिस्टलसह 600 रुपयांचे तीन जीवंत काडतुसे (Cartridge) जप्त केली आहेत. ही कारवाई नुकतीच शिरगाव रोड येथील बैलजोडी कमानीसमोर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Crime Branch Police) गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने (Pune Crime) केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अतुल प्रकाश देशमुख Atul Prakash Deshmukh (वय-26 रा. शिंदेवस्ती, सोमाटणे फाटा, ता. मावळ) आणि मारुती बाळू लोखरे Maruti Balu Lokhare (वय- 43 रा. मुपो दिवट ता. मावळ)
असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मारुती लोखरे हा दिवट गावचा माजी उपसरपंच आहे.
खंडणी विरोधी पथकाचे पोलीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पथकातील निशांत काळे (Nishant Kale) व गणेश गिरीगोसावी (Ganesh Girigosavi)
यांना माहिती मिळाली की, सोमाटणे गावातील बैलजोडी कमानीसमोर एकजण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून अतुल देशमुख याला अटक करुन त्याच्याकडून 40,600 रुपयांचे पिस्टल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त केली.
पोलिसांनी अतुल देशमुख याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने मारुती लोखरे याने पिस्टल ठेवण्यास दिल्याची माहिती दिली.
त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने लोखरे याला अटक केली.
लोखरे याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash),
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (additional commissioner of police ramnath pokle), पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ (Deputy Commissioner of Police Sudhir Hiremath),
सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर (Assistant Commissioner of Police Dr. Prashant Amritkar) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ (Senior Police Inspector Shriram Paul), पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील,
पोलीस अंमलदार निशांत काळे, सुनिल काळे, सुनिल कानगुडे, किरण काटकर, गणेश गिरीगोसावी,
शैलेश मगर, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली.
Web Title : Pune Crime | One arrested for carrying pistol by pimpri chinchwad police
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 123 नवीन रुग्ण, 142 जणांना डिस्चार्ज
Comments are closed.