पुणे न्यूज :बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | संपत्तीच्या वादातून सुनेने वृद्ध सासू व पतीला मारहाण (Beating) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे त्यानंतर बिथरलेल्या या सुनेने घरातील मौल्यवान वस्तुंची तोडफोड करत राडा घातला आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. याप्रकरणी 78 वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरून सूनेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime | Old mother-in-law and husband beaten up by Daughter in law over property dispute in Pune
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उत्तमनगर (Uttamnagar) येथील अहिरे गेटजवळ राहतात. त्यांना एक मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे.
फिर्यादीचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांची सून आणि नातू यांच्यावर आहे.
मात्र, सुन संपत्तीवरून फिर्यादीसोबत भांडण करते.
तर सोमवारी या सुनेने तिच्याच नवऱ्याला व लहान मुलाला घराबाहेर हाकलून दिले.
यानंतर फिर्यादी यांना मारण्याची धमकी दिली.
तसेच, हातोडीने त्यांच्या घरातील मौल्यवान सामानाची तोडफोड केली.
तसेच फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला सुनेने व तिच्यासोबत आलेल्या व्यक्तीने मारहाण केली, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
अधिक तपास उत्तमनगर पोलिस (Uttamnagar Police) करत आहेत.
Web Title : Pune Crime | Old mother-in-law and husband beaten up by Daughter in law over property dispute in Pune.
Post Office च्या ‘या’ बँकेत असेल खाते तर 1 ऑगस्टपासून होत आहे मोठा बदल, खर्च करावे लागतील जास्त पैसे