Pune Crime News | तुमच्या हस्ताक्षरामुळे कंपनीचा 100 कोटींचा व्यवसाय होऊ शकतो; ग्राफोलॉजी सांगणार्याकडून महिलेची 35 लाखांची फसवणूक
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | तुमच्या हस्ताक्षराचा अभ्यास केला असून तुमच्या संपर्कामुळे आमच्या कंपनीला १०० कोटींचा व्यवसाय होऊ शकतो, असे सांगून ज्येष्ठ नागरिक महिलेचा विश्वास संपादन करुन हस्ताक्षर विश्लेषक म्हणविणार्याने ३५ लाख रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी मुंबईतील (Mumbai News) एका ६१ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २७८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मनिष गंगादत्त पांडे Manish Gangadatt Pandey (वय ४३, रा. शिवानंद गार्डन, वानवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ११ मे २०२३ पासून आतापर्यंत घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी सोशल मिडियावर (Social Media) मनिष पांडे याचा
दि मॅन हु सी दि फ्युचर (The Man Who See The Future) या नावाचा व्हिडिओ बघितला.
त्यामध्ये तो चांगले हस्ताक्षर विश्लेषक असल्याचे व डॉक्टरेट असल्याचे दाखविले होते.
फिर्यादी यांनी त्याला ग्राफोलॉजी (Graphology) शिकण्याची इच्छा असल्याचे सांगितले.
तेव्हा आरोपीने त्यांना हस्ताक्षर पाठविण्याचे सांगून भेट घ्यायची असेल तर त्यासाठी २० हजार रुपये भरावे लागतील,
असे सांगितले. त्यांनी २० हजार रुपये ऑनलाईन पाठविले.
फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्याने मी तुमच्या हस्ताक्षराचा अभ्यास केला असून तुमच्या संपर्कातून आमचे कंपनीचा १०० कोटींचा व्यवसाय होऊ शकतो, असे सांगून कंपनी स्थापन करण्याची कल्पना सांगितली.
फिर्यादीच्या डेबिड कार्डचा (Debit Card) वापर करुन व रोख स्वरुपात त्याने कंपनीसाठी पैसे लागतात, असे वेळोवेळी सांगून ३५ लाख रुपये खर्च केले.
पैशांबाबत फिर्यादी यांनी विचारल्यावर त्याने पैसे परत करण्याबाबत खोटी समजूत काढून फसवणूक (Fraud Case) केली.
फिर्यादी या वयोवृद्ध व असाह्य असल्याचा गैरफायदा उठवून फसवणूक केली.
पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे (PSI Santosh Sonawane) तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Your signature can make a company worth 100 crores of business; 35 lakh fraud of woman by graphology teller
Comments are closed.