Pune Crime News | तरुणाने महिलेच्या डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी, समर्थ पोलिसांनी तरुणावर केला गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | उसने पैसे मागणार्यास आलेल्या महिलेला तुम्ही पैसे घेता, परंतु ते पैसे परत करत नाही, असे बोलल्याने महिलेच्या पतीने शिवीगाळ करत डोक्यात कठीण वस्तूने वार करुन गंभीर जखमी केले.
याबाबत मिना विजय सकट (वय ४७, रा. राजेवाडी) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अजय कैलास वाघमारे Ajay Kailla Waghmare (वय २२, रा. राजेवाडी, नाना पेठ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नाना पेठेतील आर शिंदे शाळेजवळ २० मे रोजी रात्री साडेदहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी जवळजवळ राहत असून एकमेकांना ओळखतात. कैलास वाघमारे याची पत्नी ज्योती वाघमारे या २० मे रोजी रात्री साडेदहा वाजता फिर्यादी यांची बहिण राधिका दादु केंजळे (रा. राजेवाडी) हिच्याकडे हात उसने पैसे मागण्यासाठी आली होती. त्यावेळी फिर्यादी यांनी ज्योती वाघमारे हिला तुम्ही पैसे घेता परंतु, ते पैसे परत करत नाही, असे म्हणाले. तेव्हा कैलास वाघमारे याने शिवीगाळ करुन त्याने हातामध्ये असलेल्या कठीर वस्तूने फिर्यादी यांच्या डोक्याच्या मागील बाजूवर वार केला. त्यामुळे डोक्यास जखम होऊन त्यातून रक्त येऊ लागले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी के ई एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची फिर्याद घेतली आहे. पोलीस हवालदार खान तपास करीत आहेत.
Comments are closed.