Pune Crime News | ‘मी आयुष्य संपवतोय…’ मित्राला WhatsApp वर चिठ्ठी पाठविल्यानंतर युवकाने उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime News | Young Boy Suicide In Khadakwasla Dam

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  – Pune Crime News | युवकाने खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) उडी मारून आत्महत्या (Suicide In Pune) केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, त्याने आत्महत्या करण्यापुर्वी ‘मी आत्महत्या करत आहे, माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये’ अशी चिठ्ठी (Suicide Note) लिहून मित्राला WhatsApp वर पाठविल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अनिकेत सुनील आल्हाट Aniket Sunil Alhat (21, रा. नर्‍हे, पुणे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 25 मे 2023 रोजी पहाटे अनिकेत घरातून कोणाला काही एक न सांगता बाहेर पडला होता. त्याने आपण आत्महत्या करत असून त्याबाबत कोणालाही जबाबदार धरू नये अशी चिठ्ठील लिहून ती मित्राच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविली होती. (Pune Crime News)

 

अनिकेतच्या मित्राने तात्काळ त्याबाबत त्याच्या नातेवाईकांना कळविले.
त्यानंतर अनिकेतच्या घरच्यांनी तो हरविल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये
(Bharti Vidyapeeth Police Station) दिली होती. दि. 25 मे 2023 पासून अनिकेतचा मोबाईल बंद येत होता.
कुटूंबियांनी त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही.
शेवटी अनिकेतचा मृतदेह खडकवासला धरणाच्या पाण्यावर पंप हाऊसजवळ तरंगताना आढळून आला.
त्यावरून त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

 

Web Title :  Pune Crime News | Young Boy Suicide In Khadakwasla Dam

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | बच्चू कडूंच्या दाव्यामुळं भाजप, शिवसेना अडचणीत, राणांचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics News | ‘मविआची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत’, भाजप आमदाराची जहरी टीका (व्हिडिओ)

Pune Nashik Highway Accident | पुणे – नाशिक मार्गावर भीषण अपघात, 10 मेंढ्या जागीच ठार

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन – पोलीस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र देणार्‍या उमेदवाराला अटक