Pune Crime News | कारवाई करत असताना E Challan Machine काढून घेऊन रिक्षाचालकाने स्वत:च्या अंगावर ब्लेडने केले वार
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | नो पार्किंगमध्ये (No Parking In Pune) उभ्या केलेल्या रिक्षावर कारवाई करत असताना महिला पोलीस अंमलदाराच्या (Female Police Officers) हातातून ई चलन मशीन (e-Challan Machine) हिसकावून घेतले. त्यांना तुमच्याकडे बघुन घेतो, असे म्हणून स्वत:च्या अंगावर ब्लेडने वार करुन जखमी करुन घेण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरुन बंडगार्डन पोलिसांनी वृषभ बाबा पिसे Vrishabh Baba Pise (वय २३, रा. येरवडा) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक दिपमाला राजु नायर (Police Naik Deepmala Raju Nair) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१६/२३) दिली आहे. हा प्रकार पुणे रेल्वे स्टेशनच्या (Pune Railway Station) इन गेटजवळ सोमवारी दुपारी साडेबारा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषभ पिसे हा रिक्षा घेऊन नो पार्किंगमध्ये थांबला होता. फिर्यादी या त्याच्याकडे असलेल्या ई चलन मशीनद्वारे कारवाई करत होत्या. त्यावेळी पिसे याने त्यांच्याकडील ई मशीन काढून घेतले. फिर्यादी यांना बघुन घेतो, असे म्हणून स्वत:चे अंगावर ब्लडने वार करुन घेतले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे (PSI Waghmare) तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | While taking action, the rickshaw puller took away the e Challan Machine and stabbed himself with a blade
- Pune Crime News | उत्तमनगर परिसरातील बिल्डरच्या घरी चोरी ! 29 लाखांचा ऐवज लंपास
- ACB Trap News | बीडीओंची सही पाहिजे तर ब्लॅक डॉगचे दोन खंबे द्या, दोन लाचखोर ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; पुणे पोलिसांकडून कोल्हापूर जिल्ह्यातील एकाला महाड येथून अटक
Comments are closed.