पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात दिवसेंदिवस बदलत जाणारे गुन्हेगारीचे (Crime) स्वरूप आता नवनवीन टेक्नोलॉजीमुळे (Technology) अधिकच गंभीर होत चालले आहे. या टेक्नोलॉजीच्या माध्यमातून पुण्यात (Pune) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाला व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) अश्लील व्हिडीओ कॉल रेकॉर्ड (Whatsapp Video Call) करुन तरुणाला ब्लॅकमेल (Blackmail) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तरुणाने पुणे सायबर विभागाकडे (Pune Cyber Department) तक्रार दाखल केली आहे.
पुण्यातील एका तरुणाचा नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करुन त्याच्याकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने खंडणी (Ransom) उकळण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात फेसबुक (Facebook) अकाउंटधारकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढवा (Kondhwa) परिसरात राहणाऱ्या एका 29 वर्षीय तरुणाने फेसबुकवरील नताशा नावाच्या तरुणीविरोधात तक्रार दिली आहे.
काय आहे प्रकरण ?
कोंढवा येथील तक्रारदार तरुणाला फेसबुकवरील मेसेंजरवरुन (Facebook Messenger) नताशा नावाच्या तरुणीने मेसेंज पाठवला होता. तीने शारीरिक संबंधाच्या बहाण्याने त्याचा व्हॉट्सअॅप Whatsapp नंबर मागून घेतला. त्यानंतर त्याला व्हिडीओ कॉल (Video call) करुन नग्न होण्याची विनंती केली. तो नग्न होताच त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केले. यानंतर त्याला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी कोली.
गुगल पे द्वारे दिली खंडणी
तरुणीने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाकडे खंडणीची मागणी केली. तसेच खंडणीचे Ransom पैसे ऑनलाईन पद्धतीने देण्यास सांगितले. मात्र, तरुणाच्या बँक खात्यामध्ये केवळ 957 रुपये होते. त्याने गुगल पे द्वारे (Google Pay) 957 रुपयांची खंडणी दिली.