पुणे /पिंपरी चिंचवड : बहुजननामा ऑनलाईन – येथील नाशिक फाटा पुलाखाली एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला (woman dead body found in pune) आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मृत महिलेसोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी फुरसुंगी परिसरात कालव्यात दोन मृतदेह वाहून आले होते. यामध्ये पुरुष आणि महिलेचा मृतदेह (woman dead body) काही मिनिटाच्या अंतरातच वाहून आले होते. हि घटना ताजी असतानाच आता आणखी एका महिलेचा मृतदेह आढळल्याने (woman dead body found in pune) एकच खळबळ उडाली असून पोलिसांसमोर तापाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार मृत महिलेने अंगात काळ्या रंगाचा स्वेटर घातला होता तिचा रंग गोरा आहे.
तिच्याबाबत कोणाला काही माहिती असेल तर तत्काळ सांगवी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मृतदेह मिळाल्यापासून पोलिसांनी विविध संशय व्यक्त करून त्या अनुषंगाने तपास सुरु केला आहे.
अद्यापपर्यंत ठोस अशी काही माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही.
परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही धागेदोरे हाती लागताहेत कि नाही याचा शोध घेण्यात येत आहे.
कृपया हे देखील वाचा:
Minister Eknath Shinde | मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट, अभिनेत्याला अटक
कोरोना काळात ‘दुप्पट’ झाला ‘या’ सरकारी बँकेचा नफा, इन्कममध्ये सुद्धा वाढ
Builder Avinash Bhosale | सरकारने जाहीर केलेल्या ‘या’ सवलतीचा लाभ घेऊन घेतला तब्बल 103 कोटींचा फ्लॅट
LIC New Jeevan Shanti Policy | एकदाच करा गुंतवणूक, निवृत्तीनंतर भासणार नाही पैशांची चणचण