पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | महापालिका भवन (Pune PMC) परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. शिवाजीनगर पोलिसांनी (Pune Police) तब्बल २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासून पसार झालेल्या ट्रकचालकाला पकडले. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ख्वाजामिया मस्तानमिया खान (वय २६, रा. बिदर, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. गेल्या महिन्यात २२ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास महानगरपालिका भवन परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार पृथ्वीराज विष्णुकुमार शेळके (वय २२, रा. पिंपरी) याचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. पोलिसांना ट्रकचा वाहन क्रमांक मिळाला नव्हता. अंमलदार रणजित फडतरे यांनी महापालिका भवन परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा अपघातानंतर ट्रकचालक गाडगीळ पुतळा परिसरातून कुंभारवेस चौकातून मालधक्का परिसरात गेल्याचे आढळून आले. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. तेव्हा ट्रकचालक हैद्राबादला गेल्याची माहिती मिळाली. (Pune Crime News)
दरम्यान, हैद्राबादहून ट्रकचालक निघाला असून तो मालधक्का परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने ट्रकचालक खान याला मालधक्का परिसरात ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अपघाताची कबुली दिली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे (Shivajinagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Senior PI Arvind Mane) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भोलेनाथ अहिवळे (Assistant Inspector Bholenath Ahivale), अविनाश भिवरे, रणजीत फडतरे, बशीर सय्यद, गणपत वाळकोळी आदींनी ही कारवाई केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | Truck driver escaped after accident; The discovery was made after checking 250 CCTVs
हे देखील वाचा :
Aurangabad Crime News | धक्कादायक! आईने झोपेतच पोटच्या मुलांचा घेतला जीव; औरंगाबाद हादरलं
Latur ACB Trap | दहा हजाराची लाच घेताना महावितरणचा सहायक अभियंता जाळ्यात