पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – लग्नात माहेरच्यांनी हुंडा दिला नाही म्हणून बिहारमधील एका सुसंस्कृत शिक्षिका पत्नीवर तिचा पती आणि ५ दिरांसह सासरच्या मंडळींनी गेली ३२ वर्षे अत्यंत अमानवीय पद्धतीने अनन्वित अत्याचार केल्याची दुःखदायक कहानी फेसबूकच्या माध्यमातून जगापुढे आली आहे. पीडित महिलेने आपल्यावरील अन्यायाचा व्हिडिओ फेसबूकवर टाकल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने पाटणा शहरातील गंगाब्रिज पोलीस ठाण्यात (Police Station) फेसबूक कंपनीसह पुण्यातील (Pune) स्वतःच्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तर पीडित महिला जीव वाचवून पुण्यात मुलाकडे रहायला आल्यानंतरही पतीने येथे येऊन तिला जबर मारहाण (Crime ) केल्यामुळे पतीविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Statiion) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. pune crime news this is the story of that woman on facebook 32 years of hell torture suffered by husband for dowry fir at hadapsar police station pune
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
कांचनमाला राकेशकुमार वर्मा (Kanchanmala Rakesh Kumar Verma) असे या पीडित महिलेचे नाव आहे. सासरच्या लोकांनी लग्न झाल्याच्या काही महिन्यांतच कांचनमाला (Kanchanmala) यांचा हुंड्यासाठी अनन्वित छळ सुरू केला. बिहारच्या हसनपुरा (Hasanpura of Bihar) येथे पती, सासू, सासरे आणि ५ दिरांची कौटुंबिक जबाबदारी नीट सांभाळत असताना पती अगदी क्षुल्लक कारणावरून भांडण उकरून कांचनमाला यांना बेदम मारहाण करायचा. पतीपाठोपाठ पाचही दीर माहेरच्या माणसांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा मानसिक व शारीरिक छळ (Mental and physical abuse) करीत होते.
गेल्या ३० वर्षांत नोकरीमुळे पती राकेशकुमारची (Rakeshkumar) कोलकाता (Kolkata), गया (Gaya), रायपूर (Raipur)आणि हाजीपूर (hajipur) अशा विभिन्न शहरांमध्ये बदली झाली. मात्र, राकेशकुमारने (Rakeshkumar) पत्नीला मारहाण करणे सोडले नाही. कांचनमाला (Kanchanmala) प्रत्येक शहरांत खासगी शाळेत नोकरी करून दोन मुलांचा सांभाळ करीत होत्या. मात्र, पती राकेशकुमार चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना कायम मारहाण करीत होता. कांचनमाला यांचे पाचही दीर, त्यांच्या पत्नी, नणंद हे सर्व कौटुंबिक कलह करून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करून प्रसंगी मारहाणही करीत होते.
अगदी मरणयातना भोगून कांचनमाला इतकी वर्षे निमूटपणे अन्याय सहन करीत होत्या. दोन्ही मुले शिक्षण घेऊन मोठी झाली, परंतु पतीचे अत्याचार थांबले नाहीत. वडील आणि काकांच्या भडकविण्यामुळे लहान मुलगा देखील कांचनमाला यांचा छळ करीत होता.
या कौटुंबिक हिंसाचारातून आईची मुक्तता करण्यासाठी कांचनमाला यांच्या थोरल्या मुलाने त्यांना पुण्यातील आपल्या घरी आणले. आईवरील अन्याय, अत्याचाराची कहाणी फेसबुकवर टाकली. त्यामुळे संतप्त झालेल्या राकेशकुमारने मुलगा प्रतीक वर्मा यांच्यासह बिहारची एक कंपनी आणि फेसबूकविरुद्ध पाटणाच्या गंगाब्रिज पोलीस ठाण्यात तक्रार केली. पुण्यात मुलाकडे गेल्यानंतरही राकेशकुमारने तिथे येऊन पत्नीला अर्वाच्य शिविगाळ करून मारहाण केली. त्यामुळे हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
Web Titel : pune crime news this is the story of that woman on facebook 32 years of hell torture suffered by husband for dowry fir at hadapsar police station pune
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Police News | ‘कोरोना’ संकटकाळातील पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय – उपमुख्यमंत्री अजित पवार