Pune Crime News | पीडित तीन वर्षाच्या चिमुरडीची कोर्टात साक्ष, बलात्कार करणाऱ्या नराधमाला झाली 21 वर्षांची शिक्षा

Pune Crime News | The three-year-old girl who was the victim testified in the court, the rapist was sentenced to 21 years

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime News | तीन वर्षाच्या लहान मुलीवर बलात्कार (Minor Girl Rape Case) करणाऱ्या नराधमाला पुण्यातील विशेष न्यायालयाने (Special Court) 21 वर्षांची सक्तमजुरी (Forced Labor) आणि 35 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली (Sentenced) आहे. विशेष न्यायाधीश श्रीपदा पोंक्षे (Judge Sripada Ponkshe यांनी हे आदेश दिले आहेत. सागर अरुण चव्हाण Sagar Arun Chavan (वय-33 रा. भोसरी) असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे. या प्रकरणात पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पीडित मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली होती. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी सागर चव्हाण याला अटक (Arrest) केली होती. हा प्रकार 11 एप्रिल 2015 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला होता. खटल्यात विशेष सरकारी वकील लीना पाठक (Special Public Prosecutor Leena Pathak) यांनी नऊ साक्षीदार तपासले.

 

घटनेच्या दिवशी फिर्यादी यांची मुलगी खेळण्यासाठी बाहेर गेली होती. त्यावेळी फिर्यादी या घरात काम करत होत्या.
साडेबाराच्या सुमारास त्यांची तीन वर्षाची मुलगी रडत घरी आली.
त्यावेळी फिर्यादी यांनी मुलीला रडण्याचे कारण विचारले असता तिने आरोपी सागर याने केलेल्या गैरकृत्याची
माहिती दिली. यानंतर फिर्यादी यांनी पतीला फोन करुन हा प्रकार सांगितला.
तसेच नातेवाईकांना देखील याबाबत सांगितले.

 

पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी सागर चव्हाण याला अटक केली.
खटल्यात विशेष सरकारी वकील लीना पाठक यांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली.
खटल्यात पीडित मुलीची साक्ष, फिर्यादी यांची साक्ष तसेच वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला.
कोर्टाने याच पुराव्यावरुन आरोपीला 21 वर्षांची शिक्षा आणि 35 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आर.टी. दरवडे (API R.T. Darwade) यांनी केला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title : Pune Crime News | The three-year-old girl who was the victim testified in the court, the rapist was sentenced to 21 years

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | अवकाळी पावसामुळे 8 जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

Pune Crime News | ज्यादा पैशाचे आमिष पडले महागात! तरुणीची 50 लाखांची फसवणूक, पुण्यातील घटना