पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | ‘जर्मनीमध्ये नोकर बायकाही तुझ्यापेक्षा चांगल्या आहेत, तू लो स्टँडर्ड आहेस’ असे म्हणत पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या आणि जर्मनीत (Germany) वास्तव्यास असणाऱ्या पती विरोधात पुण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हा मूळचा पुण्यातील बाणेर येथील रहिवासी असून सध्या (Pune Crime News) तो जर्मनीत असतो.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पवन योगराज ग्रोवर Pawan Yogaraj Grover (वय-43 रा. सेरेनो, पॅन कार्ड क्लब रोड, बाणेर, पुणे सध्या रा. जर्मनी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत 41 वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2006 पासून सुरु आहे. (Pune Crime News)
मिळलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्य़ादी हे उच्चशिक्षित (Highly Educated) आहेत.
त्यांचे 2006 मध्ये लग्न झाले आहे. आरोपी जर्मनीत काम करत असून तो त्याठिकाणी स्थायिक झाला आहे.
लग्न झाल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना त्रास देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दिल्लीतील गुडगाव त्यानंतर पुण्यातील औंध आणि बाणेर येथे राहात असताना आरोपीने पत्नीचा छळ केला.
‘तू सुंदर दिसत नाही, तू मला आवडत नाहीस, तू वेडसर आहेस, तुला मॉडर्न मुलीसारखे राहणे जमत नाही,
तू लो स्टँडर्ड आहेस, जर्मनीमध्ये नोकर महिला पण तुझ्यापेक्षा चांगल्या आहेत’, असे म्हणून वारंवार त्रास दिला.
फिर्यादी माहेरी निघून जाव्यात यासाठी आरोपीने त्यांना त्रास दिला.
तसेच पूर्णपणे बरबाद करुन टाकण्याची धमकी देत फिर्यादी यांना शिवीगाळ केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | the maids in germany are better than you said the wifes torture a case has been registered against the husband who lives in germany
हे देखील वाचा :
Nagpur Crime | पीडित विद्यार्थिनी सहा महिन्यांची गर्भवती, प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल
Building Collapse | भिवंडीमध्ये 2 मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना; 1 जणाचा मृत्यू