पुणे –बहुजननामा ऑनलाइन– दोन गटातील वादातून स्वारगेट (swargate) परिसरात टोळक्याने तरुणावर जीवे घेणा हल्ला करत त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. दोघे सराईत गुन्हेगार (criminals)असून त्यांना अटक केली आहे.
याप्रकरणी सुलतान करीम शेख व अश्पाक मुन्ना शेख (Sultan Karim Sheikh and Ashpak Munna Sheikh) या दोघांना अटक केली आहे. तर हसन उर्फ अच्यु रमजान शेख व आलम शेख(Hassan alias Achu Ramzan Sheikh and Alam Sheikh) या दोघावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सौरभ मारुती कसबे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशपाक व सुलतान(Ashpak and Sultan) हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दरम्यान सर्व एकाच परिसरातील आहेत. दोन गटात वाद आहेत.
तर दोन दिवसांपूर्वी रात्री फिर्यादी तरुण हा इंदिरानगर झोपडपट्टी परिसरा(Indiranagar slum area)तील वाडेकर हॉस्पिटल समोरून जात होता. यावेळी आरोपींनी त्याला पाहिले आणि हा त्यांचे वाद सुरू असणाऱ्या तरुणांसोबत राहत असल्याच्या कारणावरून त्याला शिवीगाळ केली.
“हा सुद्धा त्यांच्यातच असतो, याचाही आपण काटा काढू” अशी धमकी(Threat) देत फिर्यादीच्या दिशेने दगड मारला. हा दगड फिर्यादीच्या नाक आणि डोळे याच्या वर लागला असून फिर्यादी जखमी झाला आहे.
तर लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.
web title: Pune Crime News | Suicide attack on a youth by a mob in Swargate area due to a dispute between two groups
M-Yoga App जगभरातील लोकांसाठी M-Yoga App ची PM नरेंद्र मोदी यांची घोषणा !