पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | 22 वर्षीय तरूणीकडे शरीर सुखाची (Physical Relation) मागणी केल्यानंतर त्यास तिने नकार दिल्याने नराधमाने तिचे हात-पाय कपडयाने बांधुन गांजा (Ganja) ओढुन त्याचा धुर तिच्या नाका-तोंडात सोडुन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Crime Against Woman) केले. ही घटना दि. 17 मार्च रोजी घडली असून याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) एकाविरूध्द बलात्काराचा (Rape In Pune) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
श्रवण राजेंद्र अंकुशे Shravan Rajendra Ankushe (रा. उंड्री – Undri, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी 22 वर्षाच्या पिडीत तरूणीने पोलिसांकडे (Pune Police) फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी आणि पिडीत तरूणी यांच्या आरोपीचे दुसर्या मुलीसोबत अफेअर
(Affair With Another Girl) असल्याच्या संशयावरून तसेच पुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातुन दि. 17 मार्च रोजी भांडण झाले. आरोपीने घराचा दरवाजा लावुन पिडीत तरूणीकडे शरीर सुखाची मागणी केली. त्यास तरूणीने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आरोपी श्रवण अंकुशे याने पिडीत तरूणीचे हात कपडयाने बांधून गांजा ओढुन त्याचा धूर तिच्या नाका-तोंडात सोडला. तिच्या डोक्यात आणि पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गांजाचा धूर नाकात गेल्याने पिडीत तरूणीला गुंगी आली. त्यानंतर आरोपी अंकशेने तिच्या इच्छेविरूध्द बलात्कार केला. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तोरगल करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Stirring ! 22-year-old girl assaulted by leaving marijuana Ganja dust in her nose and mouth in kondhwa Pune rape case crime
हे देखील वाचा :
Pune Crime News | पोलीसच काय त्यांची घरेही नाही सुरक्षित; पोलीस लाईनमध्ये शिरुन चोरट्याच्या घरफोड्या
Pune Crime News | रूम भाड्याने देताय सावधान; डिपॉझिट पाठविण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक