Pune Crime News | धक्कादायक! येरवडा कारागृहात मोबाईल; तपासणी दरम्यान बाथरुममध्ये सापडला
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | येरवडा कारागृहातील (Yerwada Jail) एका बराकीमधील बाथरुममध्ये मोबाईल फोन आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कारागृह विभागाच्या वतीने सागर बाजीराव पाटील Sagar Bajirao Patil (वय ३८, रा. जेल वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२७/२३) दिली आहे. हा प्रकार सोमवारी सायंकाळी बरॅक क्रमांक ३ च्या बाथरुममध्ये आढळून आला. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात सर्व सर्कल व बॅरक यांची नियमित तपासणी केली जाते. त्याप्रमाणे सोमवारी सायंकाळी कारागृहातील अधिकारी भिरु सोमनाथ खळबुटे (Jail Officer Bhiru Somnath Khalbute), अतुल तोवर (Atul Towar) हे कारागृहातून सर्कल क्रमांक १ बरॅक क्रमांक ३ मधील बाथरुमची झडती घेत असताना तेथील बाथरुमच्या वर फिर्यादी यांना पत्रा वाकलेला दिसला. त्या ठिकाणाची झडती घेतली असता तेथे एक काळ्या रंगाचा नोकिया कंपनीचा मोबाईल आढळून आला. त्यात सीम कार्ड आढळून आले नाही. तसेच त्यांची बॅटरीचे चार्जिंग संपलेले होते. (Pune Crime News)
ही बाब अधिकार्यांनी वरिष्ठ अधिकार्यांना कळविली. कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे (IG Swati Sathe) यांनी याबाबत दोषींवर कारवाईसाठी तात्काळ गुन्हा (FIR) दाखल करण्याचे आदेश दिले. हा मोबाईल नेमका कोणी ठेवला होता. त्यावरुन कोण, कोण कोणाशी बोलले, याची माहिती घेतली जात आहे. त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे (Sub-Inspector of Police Ashok Kate) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Shocking! Mobile in Yerawada Jail; Found in bathroom during inspection
हे देखील वाचा :
Comments are closed.