Pune Crime News | रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून शिवाजीनगर पोलिसांनी केले गावठी पिस्तुल जप्त (Video)
पुणे : Pune Crime News | फर्ग्युसन रोडवरील संत तुकाराम पादुका चौकाजवळील गल्लीत संशयास्पदरित्या थांबलेल्या रेकॉर्डवरील गुंडाला शिवाजीनगर पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून गावठी पिस्टल जप्त केले आहे. (Shivaji Nagar Police)
अभिषेक राजू टेंकल Abhishek Raju Tenkal (वय २३, रा. विष्णुकृपानगर, शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ, शिवाजीनगर) असे या गुंडाचे नाव आहे. पोलिसांना मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, ज्ञानेश्वर पादुका चौकाजवळील दीनदयाळ हॉस्पिटलजवळील गल्लीत रेकॉर्डवरील गुंड थांबला असून त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे. याबातमीच्या अनुषंगाने पोलिसांचे पथक फर्ग्युसन रोडवर गेले. दीनदयाळ हॉस्पिटलच्या गल्लीत त्यांना संशयास्पद थांबलेला अभिषेक दिसला. पोलिसांना पाहताच तो पळ काढू लागला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला ३६ हजार रुपयांचे एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस आढळून आले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) धनंजय पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस हवालदार दीपक चव्हाण, प्रमोद मोहिते, महावीर वलटे, पोलीस अंमलदार सचिन जाधव, दीपक रोमाडे, इसाक पठाण, कृष्णा सांगवे, सुदाम तायडे यांनी केली आहे.



Comments are closed.