Pune Crime News | शाळेतील शिपायानेच मुलींचे कपडे बदलतानाचा काढला व्हिडिओ; इंग्लिश मिडियम शाळेतील धक्कादायक प्रकार

पुणे : Pune Crime News | शाळेतील किचन रुममध्ये मोबाईल रेकॉडिंगला ठेवून ड्रेस चेंज करण्यासाठी आलेल्या मुलींचा व्हिडिओ शिपायाने काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी शाळेतील शिपाई तुषार विलास सरोदे Tushar Vilas Sarode (रा. जुनी सांगवी) याला अटक केली आहे. याबाबत शाळेतील शिक्षकांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार एका नामांकित शाळेत ६ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शाळेत नववीतील विद्यार्थ्यांनी शाळेतील मैदानात खेळून झाल्यावर तळमजल्यावर असलेल्या किचन रुममध्ये गेल्या. किचन रुममध्ये असलेल्या तुषार सरोदे याला आम्हाला कपडे बदलायचे आहेत, तुम्ही बाहेर जा, असे सांगितले. तो रुमबाहेर गेला. मुली कपडे बदलत असताना त्यांच्या पैकी एका मुलीचे लक्ष स्वीच बोर्डकडे गेले. तेथे मोबाईल ठेवलेला दिसून आला. मोबाईलचा कॅमेरा ऑन असलेला दिसला. मुलीनी मोबाईल पाहिला तर त्यात त्या कपडे बदलत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता. घाबरुन त्यांनी हा व्हिडिओ डिलिट केला. त्यांनी फिर्यादी शिक्षकांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी मुख्याध्यापिकांना हे सर्व सांगितले. मुख्याध्यापिकांनी संस्था चालकांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी शिपाई तुषार सरोदे याला अटक केली आहे.
Comments are closed.