Pune Crime News | कारच्या धडकेत रस्ता सफाई करणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे -सासवड रोडवरील सातववाडी येथील घटना

Pune Crime News | Road sweeper killed in car collision; Incident at Satavwadi on Pune-Saswad Road

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | सकाळी रस्ते साफसफाई करुन नागरिकांची सोय करणार्‍या सफाई कर्मचारी महिलेला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Pune Accident News) महिलेचा मृत्यु (Death) झाला. (Pune Crime News)

छाया भजनदास शिंदे Chhaya Bhajandas Shinde (वय ४२, रा. आकाशवाणी, हडपसर – Akashvani, Hadapsar) असे मृत्यु पावलेल्या महिलेचे नाव आहे. हा अपघात सासवड रोडवरील सातववाडी (Satavwadi Saswad Road) येथे सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, छाया शिंदे या रस्ता झाडण्याचे काम करतात. नेहमीप्रमाणे सातववाडी येथे त्या काम करत होत्या. पुण्याहून सासवडच्या दिशेने जाणार्‍या कारचालकाचे नियंत्रण सुटले. कारने दुभाजकाला प्रथम धडक दिली. त्यानंतर झाडाला धडकून त्याने छाया शिंदे यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

या अपघाताची माहिती मिळताच हडपसर पोलीस (Hadapsar Police Station) घटनास्थळी पोहचले. त्यांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) हलविला असून पोलीस (Pune Police) कारचालकाचा शोध घेत आहेत.

Web Title : Pune Crime News | Road sweeper killed in car collision; Incident at Satavwadi on Pune-Saswad Road