Pune Crime News | पुणे विद्यापीठाच्या बोगस पदवी प्रमाणपत्राने खळबळ, बँकेत मिळवली नोकरी
पुणे : – Pune Crime News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी Savitribai Phule Pune University (SPPU) संलग्न महाविद्यालयांतून बी.कॉम पदवी उत्तीर्ण असल्याची बनावट गुणपत्रिका (Fake Marksheet) आणि पदवी प्रमाणपत्र (Fake Degree) सापडल्याने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे त्या व्यक्तीने एका नामांकित खासगी बँकेत नोकरी मिळविली असून, मागील तीन वर्षापासून तो तेथे कार्यरत आहे. (Fake Documents For Job In Bank)
परीक्षा विभागाने केलेल्या पडताळणीत प्रमाणपत्र खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाने बोगस प्रमाणपत्र देणारी रॅकेटच कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दौंड येथील के.जी. कटारिया कॉलेजमधून (KG Kataria College Daund) बी.कॉम पदवीचे सहा सत्र उत्तीर्ण झाल्याच्या गुणपत्रिका, तसेच पदवी प्रमाणपत्रांच्या आधारे ठाणे येथील खासगी बँकेत नोकरी मिळवली.
मागील तीन वर्षापासून तो बँकेत वाहन कर्ज विभागात कार्यरत आहे. बँकेतील व्यवस्थापकाने तरुणाच्या कागदपत्रांची पडताळणीसाठी चार महिन्यापूर्वी कॉलेजशी संपर्क साधला. त्यावेळी कॉलेज प्रशासनास विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागतही गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्राची पडताळणी केली. ते देखील बनावट असल्याचे उघडकीस आले. यबाबत प्रमाणपत्र कक्षाचे उपकुलसचिव ज्ञानेश्वर भोसले (Dnyaneshwar Bhosale) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
Comments are closed.