Pune Crime News | पुणे : औंध परिसरात दहशत माजविणार्‍या गुंडांना अटक ! मुळशी भागातून एक रिव्हॉल्व्हर, 3 कोयत्यांसह कार, 2 मोटारसायकली केल्या जप्त (Video)

Pune Crime News | Pune: Goons who were terrorising Aundh area arrested! A revolver, 3 knives, a car and 2 motorcycles seized from Mulshi area (Video)

पुणे : Pune Crime News | औंध येथील विधाते वस्तीत १२ ते १५ आरोपींनी हातामध्ये लाकडी दांडके व हत्यारे घेऊन येऊन दहशत निर्माण केली होती. चतु:श्रृंगी पोलिसांनी मुळशी भागातून ७ गुंडांना अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, तीन कोयते, एक कार व दोन मोटारसायकली असा ७ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. (Chaturshringi Police)

प्रतिक सुनिल कदम Pratik Sunil Kadam (वय २६), अमीर अल्लाउद्दीन शेख Amir Allaudin Shaikh (वय २८, दोघे रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध), अतुल श्याम चव्हाण Atul Shyam Chavan (वय २७, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, औंध), रॉबीन दिनेश साळवे Robin Dinesh Salve (वय २६, रा. दर्शन पार्क, डी पी रोड, औंध), समीर अल्लाउद्दीन शेख Samir Allaudin Shaikh (वय २६), जय सुनिल घेंगट Jay Sunil Ghengat (वय २१), अभिषेक अरुण आवळे Abhishek Arun Avle (वय २४, तिघे रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील असून त्यांच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

औंध येथील विधाते वस्ती येथे २८ जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता १२ ते १५ आरोपींनी गप्पा मारत असताना त्या ठिकाणी १२ ते १५ जणांनी हातामध्ये लाकडी दांडके व हत्यारे घेऊन येऊन त्यांच्या हातातील हत्यारे हवेत फिरवत दहशत निर्माण केली आहे.

या आरोपींचा शोध घेत असताना सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अनिकेत पोटे व तपास पथकातील अंमलदार यांनी मुळशी भागातून या आरोपींना पकडले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी ननवरे, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, इरफान मोमीन, बाबासाहेब दांगडे, श्रीधर शिर्के, महेंद्र वायकर, वाघेश कांबळे व सुरज खाडे यांनी केले आहे.