Pune Crime News | पुणे : शेअर मार्केट मधून 5 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 57 लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

Cheating Case
July 4, 2024

पुणे : – Pune Crime News | झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेक जण वेगवेगळ्या प्रकराच्या आमिषाला बळी पडून फसवणूक (Cheating Fraud Case) करुन घेण्याच्या घटना वारंवार घडत असतानाही लोकांवर याचा काहीच परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. शेअर मार्केटच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. पुण्यातील सदाशिव पेठेत (Sadashiv Peth Pune) राहणाऱ्या व्यक्तीला दरमहा 5 टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून 57 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत उमेश यशवंत पासलकर (वय-41 रा. जाजु वाडा, सदाशिव पेठ, पुणे) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रथमेश संजय भिलारे Prathamesh Sanjay Bhilare (वय-27 रा. दत्तवाडी पोलीस चौकी मागे, दत्तवाडी, पुणे – Dattawadi Pune) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 21 जानेवारी 2019 ते 16 फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment In Share Market) केली तर तुम्हाला तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर दरमहा 5 टक्के नफा देण्याचे आमिष दाखवले. आरोपीने फिर्यादी यांच्या कॅनरा बँक खात्यातून 57 लाख 34 हजार 260 रुपये ट्रान्स्फर करुन घेतले. हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणार असल्याचे सांगून पैशांचा अपहार केला. आरोपीने प्रॉमीसरी नोट मधील वायद्याप्रमाणे कोणतेही मुद्दल अथवा नफा न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.