Pune Crime News | पुणे: हरविलेले मांजर शोधून देतो, त्याबदल्यात शारीरीक संबंध ठेवण्याची मागणी ! महिलेच्या व्हॉटसअपवर अश्लिल व्हिडिओ व ऑडिओ पाठविले

October 17, 2024

पुणे: Pune Crime News | महिलेचे हरविलेले मांजर शोधून देतो, असे आश्वासन देऊन मोबाईल नंबर घेऊन त्याबदल्यात शारीरीक संबंध ठेवण्याची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. फिर्यादीच्या व्हॉटसअप वर अश्लिल व्हिडिओ व ऑडिओ पाठवून विनयभंग केला आहे. (Molestation Case)

याबाबत एका ४९ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आरोपी अविनाश याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी रात्री आठ ते रात्री अकरा वाजेच्या दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मांजर हरविले आहे. त्यांच्या येथे राहणार्‍या अविनाश या तरुणाने त्यांना हरवलेले मांजर शोधून देतो, असे सांगून त्यांचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर मांजर शोधून दिल्याच्या बदल्यात तुम्ही माझ्या सोबत तसेच माझ्या बॉससोबत शारीरीक संबंध ठेवा, असे बोलून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादी यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर अश्लिल व्हिडिओ व ऑडिओ पाठवून फिर्यादीस बोलला की मी तुमच्यासाठी जीव देऊ शकतो, तसेच जीव घेऊ शकतो, अशी धमकी दिली. पोलीस निरीक्षक पुरी तपास करीत आहेत.