Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : उत्तमनगर पोलिस स्टेशन – ग्रामसेवकाचे अपहरण करुन उकळली खंडणी; कारसमोर फोडली बियरची बाटली, फार्म हाऊसवर ठेवले बांधून

Pune Crime News | Pune Crime News : Uttamnagar Police Station - Village Sevak Kidnapped and Extorted; Beer bottle broken in front of car, tied on farm house

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने कारसमोर बियरची बाटली फोडून ग्रामसेवकाचे (Gram sevak) अपहरण (Kidnapping) करुन त्यांना कुडजे गावातील फार्म हाऊसवर (Farm House, Kudje) बांधून ठेवले. विषारी औषध पाजण्याची धमकी देऊन खंडणी (Extortion Case) उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी महेशकुमार नानासो खाडे (वय ३९, रा. बीवा सरोवर सोसायटी, दत्तनगर, आंबेगाव) यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये (Uttamnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५१/२३) दिली आहे त्यानुसार पोलिसांनी विकास प्रकाश गायकवाड Vikas Prakash Gaikwad (वय ३८, रा. कुडजे, हवेली) याच्यासह त्यांच्या दोन साथीदारांवर खंडणीचा (Ransom) गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशकुमार खाडे हे गुरुवारी सायंकाळी कार्यालयीन कामकाज आवरुन कारमधून कुडजे गावातून घरी जात होते. खाडे हे कुडजे गावाच्या स्मशानभूमीजवळ आले असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांची कार अडविली.
कारसमोर बियरची बाटली फोडली. हॉर्न का वाजविला, असे विचारणा करुन आपण सरपंचाचे हॉटेलवर जाऊन विषय मिटवू असे म्हणून ते फिर्यादीच्या गाडीत बसले. त्यांना दगडे फॉर्ममध्ये घेऊन गेले. तेथे वरच्या मजल्यावर फिर्यादींचे हात पाय व गळा दोरीने बांधून डांबून ठेवले. एका छोट्या प्लॅस्टिकचे बाटलीतून विष आहे, असे सांगून काहीतरी द्रव पाजण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची भीती दाखवून जबरदस्तीने फिर्यादी यांच्या खात्यातील ४९ हजार रुपये व मित्राच्या खात्यातून २४ हजार रुपये असे एकूण ७३ हजार रुपये फोन पेद्वारे त्यांच्या खात्यात वर्ग करुन घेतले. जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांचा मोबाईल व कार जबरदस्तीने काढून घेऊन त्यांच्याकडे आणखी दीड लाख रुपये आणून दे, अशी खंडणी मागितली. त्यानंतर महेशकुमार खाडे यांची सुटका झाल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Uttamnagar Police Station – Village Sevak Kidnapped and Extorted; Beer bottle broken in front of car, tied on farm house

 

हे देखील वाचा :

Barsu Refinery Project | …तर प्रकल्प करायला हरकत नाही, बारसू प्रकरणावर अजित पवारांनी मांडली भूमिका

MP Supriya Sule | बारसुतील व्हिडिओ शेअर करत खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारला केली विनंती, म्हणाल्या – ‘कोणताही प्रकल्प बळजबरीने…’

Barsu Refinery Project | बारसूतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांचे चर्चेचे आवाहन, मात्र ग्रामस्थांनी फिरवली पाठ