Pune Crime News | स्वारगेट चौकात व्यावसायिकावर फायरिंग करणार्‍या मुख्य आरोपींना क्राईम ब्रँचकडून अटक ! 2 पिस्तुलासह 31 जिवंत काडतुसे अन् साडेतीन लाखाची रोकड जप्त (Video)

Pune Crime News | pune crime branch arrested the main accused who fired at a businessman in swargate chowk 2 pistols along with 31 live cartridges and three and a half lakh cash seized

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | गेल्या आठवड्यात स्वारगेट चौकात तंबाखू व्यावसायिक लतेश सुरतवाला (51) यांच्यावर गोळीबार करणार्‍या मुख्य आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) युनिट-2 ने अटक केली आहे (Swargate Firing Case). त्यांच्याकडून 2 पिस्तुलासह 31 जिवंत काडतुसे आणि 3 लाख 52 हजार 500 रूपये असा एकुण 4 लाख 19 हजार रूपयाचा ऐवज जप्त (Pistol Seized) करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांनी दिली आहे. (Pune Crime News)

अभयकुमार सुबोदकुमार सिंग Abhay Kumar Subodkumar Singh (23, सध्या रा. मार्केटयार्ड, पुणे. मुळ रा. रामदिरी गाव, बुगुसरा, मटिहाणी ठाणा, बिहार), नितीश कुमार रमाकांत सिंग Nitish Kumar Ramakant Singh (22, सध्या रा. मार्केटयार्ड, पुणे. मुळ रा. रामदिरी गाव, बुगुसरा, मटिहाणी ठाणा, बिहार) आणि मोहमद बिलाल शेख Mohammad Bilal Shaikh (28, रा. आंबेडकरनगर, गौसिया मस्जिदजवळ, मार्केटयार्ड, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वारगेट चौकात व्यावसायिकावर फायरिंग झाल्यानंतर प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलिस करीत होते. युनिट-2 च्या पोलिसांना फायरिंगमधील मुख्य आरोपी हे कर्नाटकातील बेंगलोर येथे असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलिस अंमलदार उत्तम तारू, उज्वल मोकाशी, अमोल सरडे आणि गजानन सोनुने यांचे पथक तपासकामी बेंगलोरला रवाना झाले. पोलिसांनी तेथून तिघांना ताब्यात घेतली.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींकडून गुन्हयात वापरलेले अग्नीशस्त्र व रोख रक्कम त्यांचा साथीदार आरोपी मोहमद बिलाल शेख याच्याकडून 2 पिस्तुलासह 31 जिवंत काडतुसे, 3 लाख 52 हजार 500 असा एकुण 4 लाख 19 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना पुढील तपासकामी स्वारगेट पोलिसांच्या (Swargate Police Station) ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनित तांबे (ACP Sunil Tambe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई (PI Nandkumar Bidwai),
सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले (API Vaishali Bhosale),
पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे (PSI Nitin Kamble),
पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे (PSI Rajendra Patole), पोलिस अंमलदार संजय जाधव,
उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, नामदेव रेणुसे, मोहसीन शेख, उत्तम तारू,
राहुल राजपुरे, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे, विजय पवार, गणेश थोरात, अमोल सरडे, प्रमोद कोकणे,
गजानन सोनुने, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण आणि नागनाथ राख यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title : Pune Crime News | pune crime branch arrested the main accused who fired at a businessman in swargate chowk 2 pistols along with 31 live cartridges and three and a half lakh cash seized


हे देखील वाचा