Pune Crime News | पुणे : इंजेक्शन देऊन बेशुद्ध करुन 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; ब्लॅकमेल करणार्या नराधमाला अटक

पुणे : Pune Crime News | १४ वर्षाच्या मुलीच्या दंडावर कोणतेतरी इंजेक्शन देऊन ती बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर बलात्कार केला (Rape On Minor Girl). त्याचे फोटो काढून त्याद्वारे ब्लॅकमेल (Blackmail) करणार्या नराधमाला बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police Station) अटक केली आहे.
प्रसाद नितीन खंडाळे Prasad Nitin Khandale (वय २१, रा. ताडीवाला रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३६ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार १९ फेब्रुवारी २०२१ ते २३ आॅक्टोबर २०२३ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १४ वर्षाच्या मुलगी घरात एकटी असताना आरोपीने तिच्या दंडात कोणते तरी इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध केले. तिच्यासोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. शारीरीक संबंध (Physical relationship) प्रस्थापित करत असताना तिचे न कळत फोटो काढले. ही घटना कोणाला सांगितल्यास व आरोपी बोलवेल तेथे भेटण्यास न गेल्यास काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.
Comments are closed.