Pune Crime News | वेल्हे तालुक्यात भरदिवसा पप्पूशेठ रेणूसेचा गोळ्या झाडून खून, परिसरात खळबळ

वेल्हे/पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुणे जिल्ह्यातील तोरणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे तालुक्यात एकाचा गोळ्या (Firing In Pune) घालून खून (Murder In Pune) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.6) दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून (Pune Crime News) घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध सुरु केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नवनाथ उर्फ पप्पूशेठ रेणूसे Navnath alias Pappusheth Renuse (रा. पाबे, रामवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रेणूसे हे वेल्हे तालुक्याच्या ठिकाणी आले होते. त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला, आणि दुचाकीवरुन पळून गेले. यामध्ये गंभीर जखमी होऊन रेणूसे यांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला.
(Pune Crime News) रेणूसे यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरुन पळून गेले आहेत.
वेल्हे पोलिसांकडून (Velhe Police Station) आरोपींचा शोध घेतला जात आहे. कोणत्या कारणामुळे खून करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही.
Web Title :- Pune Crime News | Papusheth Renuse shot dead in broad daylight in Velhe taluka, excitement in the area
हे देखील वाचा :
MLA Sanjay Shirsat | ‘छत्रपती संभाजीनगर मधून औरंगजेबाची कबर हटवा’, आमदार संजय शिरसाट यांची मागणी
Amitabh Bachchan Accident | शुटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांचा अपघात, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Comments are closed.