पुणे (Pune) : बहुजननामा ऑनलाईन – Pune बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली कोसळून बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना विमानतळ येथे घडली आहे. या ठिकाणी नवीन इमारतीचे काम सुरु आहे.
मल्लेश बसप्पा चलवादी (वय 28) असे मृत्यु झालेल्या कामगाराचे नाव आहे. ठेकेदार दिनेश हरीवाल गोस्वामी (वय 38) याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक सारंग दळे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील सैनिक वसाहतीतील एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
या इमारतीचा कामगारांचा ठेका दिनेश याने घेतला होता. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मल्लेश चलवादी हा काम करत होता.
यावेळी अचानक पाय घसरून तो चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता.
याबाबत पोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
गेल्या महिन्यात (दि. 24 मे) हा प्रकार घडला होता.
यानंतर कागदपत्रांचे चौकशी केल्यानंतर ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मललेशचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
काम करून घेत असताना ठेकेदाराने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट, सुरक्षित जाळी अशी सामग्री पुरवली नाही.
उघड्या डक्टवर योग्य ते झाकण न ठेवता हलगर्जीपणा केल्यामुळेच मल्लेश चलवादीचा मृत्यू झाला.
अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.
कृपया हे देखील वाचा:
भाजपचा CM ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही, सतत मागत राहता, …यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?’
गेल्या काही वर्षाच्या तुलनेत पुण्यात मान्सूनचे आगमन लवकरच
मुंबईत लोकल सेवा पुन्हा केव्हा सुरू होणार? मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले…
चालत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची गळा चिरून हत्या, प्रियकरानं जेलमध्ये घेतला गळफास
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! 280 जागांसाठी भरती, लवकर करा अर्ज