पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | शहरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या (Dattawadi Police Station) हद्दीत भरदिवसा एका तडीपार गुंडाचा कोयत्याने सपासप वार करून खून (Murder in Pune) करण्यात आला आहे. रविवारी भरदिवसा ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली असून परिसरात बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अक्षय किरतकिर्वे (वय 36) असे खून झालेल्या गुन्हेगारीचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याच्यावर पोलिसांनी नुकतीच तडीपरीची कारवाई केली होती. तरीही तो पुण्यात त्याच्याच हद्दीत फिरत होता. या दरम्यान आज 7 वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर चौघांनी भरस्त्यात कोयत्याने आणि तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून त्याचा खून केला. त्यानंतर हे चौघे तेथुन पसार झाले आहे. यादरम्यान ही माहिती मिळाल्यानंतर दत्तवाडी पोलीस (Dattawadi Police) व गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
हा खून दत्तवाडीतील वर्चस्वाच्या वादातून त्याचा भररस्त्यात खून झाला असल्याची चर्चा होत आहे.
अद्यापही खूनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी समाजकंटकांनी अक्षयचा अशा पध्दतीनं खून केला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
Web Title :- pune crime news | murder of criminal akshay kiratkirve in dattawadi area of pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update