Pune Crime News | पुण्यात भरदिवसा व्यापार्यास ‘दृश्यम स्टाईल’ने लुटणार्या मास्टरमाइंडला समर्थ पोलिसांकडून अटक; 500 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले पण…

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुण्यात भरदिवसा व्यापार्यास कोयत्याचा धाक दाखवुन (Fear Of The Koyta) त्याच्याकडील 47 लाख रूपये (Pune Robbery) दृश्यम स्टाईलने (Drishyam Style) लुटणार्या मास्टरमाइंडला समर्थ पोलिसांनी (Samarth Police Station) अटक केली आहे. सदरील गुन्हयाचा तपास करताना सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ, फरासखाना, डेक्कन, विश्रामबाग आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व पोलिस अंमलदारांनी तब्बल 500 पेक्षा अधिक CCTV कॅमेरे तपासले होते. पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill), एसीपी सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) आणि समर्थ पोलिस ठाण्याचे (Pune Police) वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे (Sr PI Ramesh Sathe) यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दि. 23 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास दोघांनी कोयत्याचा धाक दाखवुन व्यापार्याकडील 47 लाख रूपये लटले होते. याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता. यासंदर्भात मंगलपुरी भिकमपुरी गोस्वामी (55, रा. सिटी सर्व्हे नं. 208, मंगळवार पेठ -Mangalwar Peth) यांनी फिर्याद दिली आहे. गोस्वामी हे गेल्या 30 वर्षापासुन पन्ना एजन्सीमध्ये 30 वर्षापासून कामाला आहेत. ते दररोज एजन्सीमध्ये जमा होणारी रक्कम सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास रास्ता पेठेतील बँक ऑफि इंडियामध्ये (Bank Of India Rasta Peth Pune) भरण्यासाठी जातात.
दि. 23 मार्च रोजी त्यांना कोयत्याच्या धाकाने लुटण्यात आले होते. सदरील गुन्हयाच्या तपासा दरम्यान पोलिसांनी 500 हुन अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी आरोपी हे गहुंजे गाव, पिंपरी-चिंचवड परिसरात पळुन गेल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा करण्यापुर्वी आरोपी हे कोणत्या दिशेने आले याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित रिक्षा सदरील ठिकाणी फिरताना आढळुन आली. त्या फुटेजचा आधार घेवुन सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे (API Prasad Lonare) व त्यांच्या पथकाने रिक्षत्तची माहिती मिळवली आणि रिक्षा चालकास ताब्यात घेतले. (Pune Crime News)
सदरील गुन्हयात स्कुटर चालविणारे किशोर अशोक पवार Kishor Ashok Pawar (रा. अप्पर, बिबवेवाडी – Bibvewadi) आणि आकाश कपील गोरड Akash Kapil Gorad (अप्पर बिबवेवाडी) यांची नावे निष्पन्न झाली. दोघेही रेकॉर्डवरील आरोपी आहेत. पण त्यांच्यासोबत तिसरा व्यक्ती जो रिक्षामध्ये दिसत होता त्याच्या तपास केला असता तो आरोपींचा मित्र ऋषीकेश गायकवाड Rishikesh Gaikwad (रा. इंदिरानगर, अप्पर, बिबवेवाडी) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आरोपी ऋषीकेश गायकवाड याच्याकडे सखोल तपास केला असता तो सन 2019 पासुन पन्ना एजन्सीमध्ये गॉरड फ्रे फिलीप्स इंडिया लि., या कंपनी मार्फत सिगरेट विक्री करण्याकरिता सेल्समन म्हणुन कामाला होता. भांडण केल्यामुळे त्याला ऑक्टोबर 2022 मध्ये कामावरून काढून टाकले होते. गायकवाड हा पन्ना एजन्सीमध्ये कामाला असल्याने त्याला एजन्सीमध्ये दररोज 20 ते 25 लाखापेक्षा जास्त रक्कम फिर्यादी गोस्वामी हे बँकेत भरण्यासाठी जातात हे वेळेसह माहित होते. ऋषीकेश गायकवाडने त्याचे साथीदार किरण पवार आणि आकाश गोरड यांच्या मदतीने दृश्यम स्टाईलने पैसे लुटण्याचा प्लॅन तपयार केला. त्यांनी चार दिवस रास्ता पेठ आणि पन्ना एजन्सीच्या परिसरात रेकी केली व पळुन जाण्यासाठी कॅमेरे नसलेला रोड देखील पाहुन ठेवला होता.
दि. 22 मार्च रोजी गुडीपाडवा असल्याने बँका बंद होत्या. त्यामुळे त्यांनी दि. 23 रोजी दोन दिवसांची
एजन्सीमधील रक्कम लुटण्याचे ठरवले. दि. 23 रोजी सकाळी 9 वाजता पन्ना एजन्सीजवळ रिक्षामध्ये येवुन
किरण पवार व आकाश गोरड यांना पैसे घेवुन जाणारा व्यक्त दाखविण्यात आला आणि ऋषिकेश गायकवाड
हा रिक्षामधून घरी गेला. तो स्वतःच्या घरात असलेल्या कॅमेर्याखाली दिवसभर बसुन राहिला.
मास्टरमाइंड ऋषिकेश गायकवाडकडून आतापर्यंत गुन्हयातील 25 लाख रूपये आणि अॅक्टिव्हा स्कुटर जप्त
करण्यात आली आहे. पोलिस किरण अशोक पवार आणि आकाश कपिल गोरड याचा युध्दपातळीवर शोध घेत आहेत.
ही कामगिरी अप्पर आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), उपायुक्त संदीप सिंह गिल्ल,
सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे, पोलिस निरीक्षक (गुन्हे)
प्रमोद वाघमारे (PI Pramod Waghmare) यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे,
पोलिस उपनिरीक्षक सौरभ माने (PSI Saurabh Mane), सुनिल रणदिवे (Sunil Randive),
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महिला उपनिरीक्षक मिरा त्र्यंबके (WPSI Meera Trimbake), उपनिरीक्षक सौरभ थोरवे
(PSI Saurabh Thorve), उपनिरीक्षक दिपक यादव (PSI Deepak Yadhav),
सहाय्यक निरीक्षक राकेश जाधव (API Rakesh Jadhav), उपनिरीक्षक निलेश मोकाशी
(PSI Nilesh Mokashi), उपनिरीक्षक राकेश सरडे (PSI Rakesh Sarade),
सहय्यक निरीक्षक भोलेनाथ अहिवळे (API Bholenath Ahiwale), पोलिस अंमलदार दत्तात्रय भोसले,
गणेश वायकर, रहिम शेख, हेमंत पेरणे, अमोल शिंदे, मंगेश जाधव, शरद घोरपडे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी,
रिकी भिसे, निलम कर्पे, जितु पवार, प्रियंका खेडेकर, योगिता आफळे, कुडाळकर, प्रविण पासलकर, वैभव स्वामी,
मयुर भोसले, संदिप पवार, शरद गायकवाड, संदिप तळेकर, सागर घाडगे, मयुर भोसले, आशिष खरात,
अर्जुन थोरात, बशीर सैय्यद, रणजित फडतरे आणि सचिन गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.
Web Title :- Pune Crime News | Mastermind who robbed traders in broad daylight in Pune in ‘Drishyam style’ arrested by Samarth Police; Checked 500 CCTV cameras but…
हे देखील वाचा :
NCP MP Mohammed Faizal | शरद पवारांना दिलासा, राष्ट्रवादीच्या खासदाराला पुन्हा सदस्यत्व बहाल
Comments are closed.